मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फोटो काढायला गेले अन् नियतीच्या फ्रेममध्ये झाले कायमचे कैद; 6 फोटोग्राफर्सचा करुण अंत, कहाणी वाचून पाणावतील डोळे

फोटो काढायला गेले अन् नियतीच्या फ्रेममध्ये झाले कायमचे कैद; 6 फोटोग्राफर्सचा करुण अंत, कहाणी वाचून पाणावतील डोळे

Terrible Road Accident: भीषण अपघातात मृत पावलेले सर्व फोटोग्राफर्स एका कार्यक्रमानिमित्त फोटो काढण्यासाठी जात होते. पण नियतीनं त्यांनाच फ्रेममध्ये कायमचं कैद केलं आहे.

Terrible Road Accident: भीषण अपघातात मृत पावलेले सर्व फोटोग्राफर्स एका कार्यक्रमानिमित्त फोटो काढण्यासाठी जात होते. पण नियतीनं त्यांनाच फ्रेममध्ये कायमचं कैद केलं आहे.

Terrible Road Accident: भीषण अपघातात मृत पावलेले सर्व फोटोग्राफर्स एका कार्यक्रमानिमित्त फोटो काढण्यासाठी जात होते. पण नियतीनं त्यांनाच फ्रेममध्ये कायमचं कैद केलं आहे.

इटावा, 10 मार्च: इटावा-मैनपुरी मार्गावर एका वेगवान कारला भीषण अपघात (terrible car accident) झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारचं अचानक चाक फुटल्यानं अनियंत्रित कारने थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवरील एका वेगवान ट्रकला जोरदार धडक मारली आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारमधील 6 फोटोग्राफर्सच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या (6 photographers died on the spot) आहेत. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. संबंधित सर्व फोटोग्राफर्स एका कार्यक्रमानिमित्त फोटो काढण्यासाठी जात होते. पण नियतीनं त्यांनाच फ्रेममध्ये कायमचं कैद केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्व फोटोग्राफर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जसवंत नगर येथून निघाले होते. इटावा-मैनपुरी रस्त्यावरून भरधाव वेगानं जात असताना अचानक कारचा पुढील टायर फुटला. गाडी दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने दुसऱ्या लेनवर पोहोचली. दरम्यान विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मिनी ट्रकला कारने जोरदार धडक दिली. समोरून येणाऱ्या ट्रकचा देखील वेग अधिक असल्यानं कारचं इंजिन तुटून बाजूच्या शेतात जाऊन पडलं आहे.

हेही वाचा-धमकी देत स्वत:च्या मृत्यूला दिलं आमंत्रण; राजापुरात महिलेनं तरुणाला दगडानं ठेचलं

तर कारची चाकं हवेत उसळताना दिसली. कारचं इंजिन तुटून बाहेर पडताच अपघातग्रस्त कार मिनी ट्रकच्या आतमध्ये घुसली होती. या दुर्दैवी अपघातात सहा फोटोग्राफर्सचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयावह होता की, घटनास्थळी आलेल्या नागरिकांचा थरकाप उडाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. सैफई पोलिसांनी रुग्णवाहिकेसह तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा-पबजीच्या नादात तरुणानं खरोखर 500 फूट खोल दरीत मारली उडी, नंदुरबारमधील थरारक घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'राधिका फोटो स्टुडिओ' हा स्टुडिओ परिसरात फोटोग्राफी आणि शूटिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे. घिरोर आणि मैनपुरी येथील दोन कुटुंबांच्या लग्न समारंभाचं शूटींग करण्याचं काम या स्टुडिओला देण्यात आलं होतं. त्यासाठी चालकासह 10 जण इर्टिगा कारने मैनपुरीच्या दिशेनं जात होते. साडेअकरा वाजता फोटोग्राफर्सची टीम इर्टिगा कारने तर दुसऱ्या एका कारने स्टुडिओचे मालक गोपाल शिवहरे, त्यांची पत्नी आणि मुलगी मैनपुरीच्या दिशेनं जात होते. दरम्यान इर्टिगा कारचं चाक फुटून हा भीषण अपघात झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Road accident, Uttar pradesh