वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; सहा जणांचा मृत्यू, आरोपीनंही केली आत्महत्या

वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार; सहा जणांचा मृत्यू, आरोपीनंही केली आत्महत्या

एका बंदुकधारी व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार (Gun Shoot) केला. या घटनेत 6 जण ठार (6 People Killed in Gun Firing) झाले असून घटनेनंतर या व्यक्तीनं आत्महत्या केल्याचे पोलिसांनी (Police) सांगितलं.

  • Share this:

कोलोरॅडो (अमेरिका) 10 मे : कोलोरॅडो (Colorado) येथे रविवारी एका वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) एका बंदुकधारी व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार (Gun Shoot) केला. या घटनेत 6 जण ठार झाले असून घटनेनंतर या व्यक्तीनं आत्महत्या केल्याचे यूएस पोलिसांनी (US Police) सांगितलं. कोलोरॅडो स्प्रिंग्ज पोलिसांना रविवारी मध्यरात्री होम पार्क (Home Park) येथून एक इमर्जन्सी कॉल आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता 6 जणांचा गोळी लागून मृत्यू (6 People Killed in Gun Firing) झाला होता आणि 1 जण गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले.

जखमी इसमाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. ही गोळीबाराची घटना घडली तेव्हा काही लोक वाढदिवसाच्या समारंभासाठी एकत्र जमले होते, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. य़ा घटनेतील संशयित हा घरी पार्टी असलेल्या महिलेचा प्रियकर होता. हा समारंभ सुरु असताना तो त्या महिलेच्या घरात घुसला आणि त्याने पार्टीत सहभागी झालेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याचे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

इसमाचा गोळीबार करण्यामागे नेमका काय हेतू होता, हे अजून स्पष्ट झालेलं नसून त्याबाबत चौकशी सुरु आहे. या हल्ल्यावेळी पालकांनी योग्य काळजी घेतल्यानं पार्टीत सहभागी असलेल्या कोणत्याही बालकांना इजा झालेली नाही. तसेच पीडितांची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोलोरॅडो स्प्रिंग्जचे (Colorado Springs) पोलीस प्रमुख विन्स निस्की यांनी सांगितले, की घटनास्थळी तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही त्या अज्ञान इसमाने गोळीबार केल्यानं आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. अशा प्रकारची घटना पुन्हा आपल्या समाजात घडणार नाही याबाबत आम्ही आशावादी आहोत.

होमपार्क येथील एका महिलेने डेन्व्हर पोस्टला सांगितले, की गोळीबाराचा आवाज ऐकून मी तातडीने घराबाहेर आले. मला वाटले की वादळ वैगरे आले आहे.

ऑक्टोबर 2015 पासून सामूहिक गोळीबाराची घडलेली ही तिसरी घटना आहे. हॅलोविन हत्याकांड, मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पॅरंटहूड क्लिनिकवरील हल्ला यानंतरची ही तिसरी घटना असल्याचे स्थानिक मीडियाने सांगितले. अमेरिकेत अलिकडच्या काही महिन्यांत अशा प्रकारच्या गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात इंडियाना पोलिसातील फेडएक्स सुविधा केंद्रावरील गोळीबार, कॅलिफोर्निया येथील ऑफिस बिल्डींगमधील गोळीबार, कोलोरॅडो येथील ग्रोसरी शॉपवर हल्ला तसेच अनेक स्पावर झालेले हल्ले यांचा समावेश आहे.

अमेरिकेतील गोळीबाराच्या घटना या महामारी तसेच आंतरराष्ट्रीय पेच असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (President Joe Biden) यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते.गेल्या वर्षभरात अमेरिकेत गोळीबाराच्या विविध घटना तसेच आत्महत्येच्या घटनांमध्ये 43,000 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी गन व्हायोलन्स अर्काइव्हची आकडेवारी सांगते.

Published by: Kiran Pharate
First published: May 10, 2021, 4:59 PM IST

ताज्या बातम्या