मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

6 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी शाळा केल्या रिकाम्या

6 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी शाळा केल्या रिकाम्या

Bengaluru school bomb threat: हिजाबबाबत राज्यात जोरदार वाद सुरू असताना बंगळुरूमधील शाळांना ही धमकी मिळाली आहे. हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळं शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार प्रशासनाला आहे, असं हायकोर्टानं निकालात म्हटलं होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

बंगळुरू, 8 एप्रिल : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 6 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. त्यात असं म्हटलंय की, शाळांमध्ये अत्यंत शक्तिशाली बॉम्ब लावण्यात आले आहेत. धमकीचे ईमेल आल्यानंतर शाळा रिकाम्या करण्यात आल्या आहेत. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांनी संशयित बॉम्बचा शोध सुरू केला आहे. हा सगळा प्रकार कोणी भीती घालण्यासाठी किंवा विघातक काम करण्याच्या उद्देशानं हा प्रकार केला आहे का, हे सखोल तपासानंतरच कळेल, असं पोलीस आयुक्त कमल पंत यांनी सांगितलं.

धमक्या मिळालेल्या शाळांमध्ये बंगळुरू पूर्वेतील डीपीएस, महादेवपुरा येथील गोपालन इंटरनॅशनल स्कूल, मराठाहल्ली येथील न्यू अॅकॅडमी स्कूल, गोविंदपुरा येथील इंडियन पब्लिक स्कूल, हेन्नूर येथील सेंट व्हिन्सेंट पॉल स्कूल आणि एबेंझर इंटरनॅशनल स्कूल यांचा समावेश आहे. धमकी मिळाल्यानंतर शाळेतील सर्वांना बाहेर सोडण्यात आलं. मुलांव्यतिरिक्त शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आलं. पालकांना मुलांना घेऊन जाण्यास सांगितलं आहे.

हे वाचा - आपला ‘O Blood Group’ आहे असं समजून केलं रक्तदान; मात्र, कळली ही खास बाब

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांना धमकी देणारे ईमेल शुक्रवारी सकाळी 10.15 ते 11 या वेळेत पाठवण्यात आले होते. वेगवेगळ्या आयडीवरून हे ईमेल पाठवण्यात आले आहेत. धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये लिहिलं होतं, 'तुमच्या शाळेत एक अतिशय शक्तिशाली बॉम्ब लावण्यात आला आहे. लक्षात ठेवा हा विनोद नाही. हा विनोद नाही. शाळेत खूप शक्तिशाली बॉम्ब आहे. ताबडतोब पोलिसांना कॉल करा. तुमच्या जीवनासह शेकडो जीवनं प्रभावित होऊ शकतात. उशीर करू नका. आता सर्व काही तुमच्या हातात आहे!' असं या मेलमध्ये म्हटलं होतं.

हे वाचा - अपघातग्रस्त गाड्यांमध्ये पार्ट्स बसवण्यासाठी अशा प्रकारे चोरायचे दुसऱ्या कार

हिजाबबाबत राज्यात जोरदार वाद सुरू असताना बंगळुरूमधील शाळांना ही धमकी मिळाली आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थिनींना हिजाब घालण्यापासून रोखल्यानंतर उग्र निदर्शनं झाली. नंतर उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीने हे प्रकरण थोडं शांत झालं.

हिजाब हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही. त्यामुळं शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार प्रशासनाला आहे, असं हायकोर्टानं निकालात म्हटलं होतं.

First published:

Tags: Bengaluru, Bomb Blast, School