मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई, गुजरातमधून एक हजार कोटींचं MD ड्रग्ज जप्त

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलची मोठी कारवाई, गुजरातमधून एक हजार कोटींचं MD ड्रग्ज जप्त

Mumbai Drugs Seized: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने 513 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटकही केली आहे.

Mumbai Drugs Seized: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने 513 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटकही केली आहे.

Mumbai Drugs Seized: मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने 513 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटकही केली आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने गुजरातच्या (Gujarat) भरूच (Bharuch) जिल्ह्यात ड्रग्ज (Drugs) बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी भरूचमधील अंकलेश्वर परिसरातून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त केले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1,026 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह सात आरोपींनाही अटक केली आहे. यापैकी 5 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून दोन आरोपी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कोठडीत आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात शिवाजी नगरमधून मुंबई पोलिसांनी ड्रग्जची खेप पकडली होती, तेव्हापासून पोलीस त्याचा स्रोत शोधण्यात गुंतले होते. ही खेप पकडण्यासाठी मुंबई पोलिसांना पाच महिने संघर्ष करावा लागला. मार्च महिन्यापासून मुंबई पोलिसांचा अंमली पदार्थ विरोधी कक्ष यावर सातत्याने काम करत होता. अनेक राज्यात पसरलेली ही आंतरराज्यीय ड्रग्ज टोळी असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे. ही टोळी तरुणांना टार्गेट करते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी विशेषतः तरुणांना टार्गेट करते. ही औषधे हाय प्रोफाईल सर्कलमध्ये पुरवली जातात. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने मुंबईतील शिवाजी नगर परिसरातून अमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा एमडी (ड्रग्ज) साठाही जप्त केला आहे. तेव्हापासून पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. 24 तासात कुटुंब पोरकं; एकापाठोपाठ 3 सख्ख्या भावांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? नालासोपारा येथून 1400 कोटींचे अंमली पदार्थ पकडले त्यानंतर 3 ऑगस्ट रोजी मुंबईतील नालासोपारा येथून अमली पदार्थ विरोधी सेलने 1,403 कोटी रुपये किमतीचे 701 किलो मेफेड्रोन (MD) जप्त केले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक केली होती. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या महिलेला 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे 2 ऑगस्ट रोजी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. केमिस्ट्रीचा पदवीधर बनवत होता ड्रग्ज या प्रकरणातील पाचव्या आरोपीला 3 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांसह अटक करण्यात आली होती. पाचवा आरोपी रसायनशास्त्राचा पदवीधर होता. आरोपीने आपल्या ज्ञानाचा उपयोग ड्रग्ज बनवण्यासाठी केला. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत होता. सर्व आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Drugs, Mumbai

    पुढील बातम्या