मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईत भावा-वहिनीच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर आरोपीकडून महिन्याभर बलात्कार

मुंबईत भावा-वहिनीच्या मदतीनं अल्पवयीन मुलीवर आरोपीकडून महिन्याभर बलात्कार

Mumbai Crime: एका 50 वर्षाच्या नराधमानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.  भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada police) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime: एका 50 वर्षाच्या नराधमानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada police) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime: एका 50 वर्षाच्या नराधमानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada police) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई, 24 जून: एका 50 वर्षाच्या नराधमानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. भोईवाडा पोलिसांनी (Bhoiwada police) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपीनं गेल्या महिन्याभरापासून पीडित मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याचं समजतंय. धक्कादायक म्हणजे पीडित मुलीच्या भावाला आणि वहिनीला या अत्याचाराविषयी कल्पना होती. पीडित मुलीनं याची कल्पना त्यांना दिली होती. त्यामुळे या अत्याचाराकडे (Sexual Assault) दुर्लक्ष केल्यानं पोलिसांनी पीडित मुलीच्या भावावर आणि वहिनीवरही गुन्हा दाखल केला आहे. (Raping a 15-year-old girl multiple times for over a month)

पीडित अल्पवयीन मुलगी ही उत्तर प्रदेशमधील लखनऊ (Lucknow in Uttar Pradesh) येथील रहिवासी आहे. पीडित आजारी पडल्यानं तिला परळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. मात्र तिची प्रकृती चिंताजनक झाल्यानं तिला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले असल्याचं डॉक्टरांना समजले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं की, माझा भाऊ आणि त्याची पत्नीनं मला एप्रिल महिन्यात आरोपी मोहम्मद शेख याच्याकडे पाठवलं होतं. त्यानं माझ्यावर अनेकदा बलात्कार केल्याचं पीडितीनं सांगितलं. तसंच आरोपीने डहाणू आणि नालासोपारा येथे नेऊन बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. या लैगिंक अत्याचाराबद्दल मी माझ्या भावाला आणि वहिनीला सांगितलं. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं पीडित मुलीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

हेही वाचा- 'या' 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचं थैमान, रुग्णांचा आकडा ऐकून बसेल धक्का

पीडित मुलीच्या जबाबानंतर, भोईवाडा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक मुलांच्या संरक्षण (POCSO) च्या भारतीय दंड संहितेच्या (IPC)  (woman to compel her marriage) विवाहासाठी (366) बलात्कार आणि अपहरण केल्याबद्दल संबंधित कलमांतर्गत शून्य एफआयआर नोंदवला आहे.

हा गुन्हा नालासोपारा कार्यक्षेत्रात घडला असल्यानं या प्रकरणाचा पुढील तपास हा नालासोपारा पोलिसांकडे देण्यात आला असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनोद कांबळे यांनी एफआयआर नोंदवल्याचं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai, Rape, Rape case