Home /News /crime /

12 वर्षीय मुलीसोबत लग्न करण्यासाठी आला होता 50 वर्षीय घोडनवरा, गावकऱ्यांनी चांगलाच धोपटला

12 वर्षीय मुलीसोबत लग्न करण्यासाठी आला होता 50 वर्षीय घोडनवरा, गावकऱ्यांनी चांगलाच धोपटला

एका घटनेत एक बारा वर्षांची मुलगी आणि 50 वर्षांच्या वराचं लग्न करून देण्यात येत होतं. मात्र, सतर्क आणि मानवतावादी ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडला.

    सीतामढी, 18 जून : एका शतकापूर्वीपर्यंत जरठ-कुमारी विवाहाच्या अनिष्ट घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. आर्थिक लाभासाठी गरीब घरातील मुलींचे वयस्कर पुरुषांशी विवाह केले जात (child marriage) असत. मात्र, समाजसुधारणांनी अशा पद्धती खूप कमी झाल्या आहेत. मात्र, देशात काही ठिकाणी अशा घटना अजूनही घडत असल्याचं अनेकदा समोर आलंय. अशाच एका घटनेत एक बारा वर्षांची मुलगी आणि 50 वर्षांच्या वराचं लग्न करून देण्यात येत होतं. मात्र, सतर्क आणि मानवतावादी ग्रामस्थांनी हा प्रकार हाणून पाडला. पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी झाल्यामुळं आणि इतर कारणांमुळं गरीब घरातील अल्पवयीन मुलींची पैशांसाठी विक्री होण्याच्या घटना घडत आहेत. अनेक राज्यांमध्ये अशा मानवी तस्करी करणाऱ्या दलालांच्या टोळ्या सक्रिय आहेत. वरकरणी लग्नाच्या नावाखाली झालेल्या पैशांच्या अवैध व्यवहारामध्ये अनेक अल्पवयीन निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त (child marriage) होत आहे. राजस्थानमधील अजमेरमधून अशाच एका 50 वर्षीय नवऱ्याची वरात सीतामढी जिल्ह्यातील एका गावात पोहोचली होती. येथील बालवधूला लग्नासाठी सजवून तयार केलं होतं. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळं या मुलीचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचलं आहे. चिडलेल्या लोकांनी अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 50 वर्षांच्या घोडनवऱ्याची चांगलीच धुलाई करत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. नानपूर ब्लॉकमधील बहेरा गावात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीचं लग्न गावातील रझिया खातून नावाच्या महिला दलाल आणि कृष्णनंदन नावाच्या पुरुष दलालामार्फत राजस्थानमधील अजमेरमधील रहिवासी गोपाळ राम नावाच्या व्यक्तीशी केलं जात होतं. ठरलेल्या तारखेला तो सजून-धजून लग्नासाठी आलाही होता. तो शहरातील कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये राहिला होता. दरम्यान, दलालांकडून मिळणाऱ्या पैशांच्या लोभानं या निष्पाप अल्पवयीन मुलीचं तिच्या नातेवाईकांनी लग्न ठरवल्याचं आणि तिला सजवून कृष्णा कॉम्प्लेक्समध्ये नेल्याचं ग्रामस्थांना समजलं.  संतप्त लोकांनी थेट लग्नाचं स्थळ असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्सवर हल्ला चढवला. तिथं 50 वर्षांचा वर पाहून त्यांच्या तळपायायची आग मस्तकात गेली. सर्वांनीच या नवऱ्यावर हात साफ करून घेतले. अखेर सर्वांनी त्याच्या बरोबरच्या इतर व्यक्तींसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. हे वाचा - ‘खूपच तरुण दिसतोयस’; ओळखलत का ‘या’ अभिनेत्याला? नवा लुक होतोय व्हायरल अल्पवयीन मुलींचं वयस्कर पुरुषाशी लग्न झाल्यामुळे त्यांना भयानक शारीरिक अत्याचाराला सामोरं जावं लागल्याच्या अनेक घटना घडत आहेत. तसंच, अशा पुरुषांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाट्याला त्या-त्या ठिकाणच्या प्रथा-परंपरांप्रमाणे अगदी तरुण वयातच विधवेचं आयुष्य आल्याच्याही घटना आहेत. त्यांना कोणत्याही मोबदल्याशिवाय मोलकरणीसारखं वागवलं जातं. तसंच, पैसे देऊन खरेदी केलेल्या मुलींना वैवाहिक आणि वैधव्य अशा दोन्ही स्थितीत कोणतेही अधिकार दिले जात नसून त्यांना अनेक यातनांमधून जाताना जनावरांहूनही वाईट वागणूक मिळते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Child marriage, Marriage

    पुढील बातम्या