मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

संतापजनक! 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; गळा आवळून निर्घृण हत्या

संतापजनक! 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; गळा आवळून निर्घृण हत्या

Rape on minor girl: एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी बलात्कार (5 years old girl rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने संधी साधून या चिमुरडीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

पुढे वाचा ...
    बदायू, 12 एप्रिल: एका 5 वर्षांच्या निष्पाप मुलीवर पाशवी बलात्कार (5 years old girl rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने संधी साधून या चिमुरडीला आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने संबंधित मुलीची गळा आवळून निर्घृण हत्या (rape and murder) केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम चोप दिला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक (Accused arrest) करण्यात आली आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातील आहे. येथील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर अमानुष बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीनं तिची गळा आवळून हत्या केली. त्याचवेळी शेतीच्या दिशेनं जाणाऱ्या काही गावकऱ्यांनी संबंधित प्रकार पाहिला. पीडित मुलगीही मृतावस्थेत तिथेच पडली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी 30 वर्षीय आरोपी युवकाला रंगेहाथ पकडलं आणि बेदम चोप दिला. दरम्यान गावातील एकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी युवकाला ताब्यात घेतलं. गावातील लोकांचा आक्रोश पाहाता पोलिसांनी त्वरित पीडित मुलीचा मृतदेह घटनास्थळावरून हलवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. हे ही वाचा-पुण्यातील धक्कादायक घटना! IT कंपनीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार या प्रकरणी एसएसपी संकल्प शर्मा यांनी सांगितलं की, '5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, India, Murder, Rape case, Rape on minor, Shocking news, Uttar pradesh

    पुढील बातम्या