मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /5 वर्षांचा चिमुरडा उकळत्या पाण्यात पडला, 3 दिवसांपासून घरातच होता तडफडत, शेवटी मृत्यूने गाठलं!

5 वर्षांचा चिमुरडा उकळत्या पाण्यात पडला, 3 दिवसांपासून घरातच होता तडफडत, शेवटी मृत्यूने गाठलं!

चिमुरड्याच्या वडिलांचा बिर्याणीचं दुकान आहे. ते त्याची तयारी होते.

चिमुरड्याच्या वडिलांचा बिर्याणीचं दुकान आहे. ते त्याची तयारी होते.

चिमुरड्याच्या वडिलांचा बिर्याणीचं दुकान आहे. ते त्याची तयारी होते.

इंदूर, 25 डिसेंबर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) सिवनीमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना (Shocking News) समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील (Viral Video) आहे. येथे एक 5 वर्षांचा मुलगा उकळत्या पाण्यात पडल्याचं दिसत आहे. उकळत्या पाण्यात पडल्याने तो जळाला होता. गेल्या तीन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र यातच त्याचा मृत्यू झाला. ज्या भांड्यात मुलगा पडला, त्यात बिर्याणीसाठी पाणी गरम करायला ठेवलं होतं. वडिलांसोबत खेळत असताना तो मागे गेला आणि उकळतं पाणी असलेल्या भांड्यात पडला. हा सर्व प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

विरेंद्र लोधी यांचं एक बिर्याणी शॉप आहे. विरेंद्र मंगळवारी बिर्याणी करण्यासाठी तयारी करीत होता. विरेंद्रचा मुलगा शिवादेखील तेथेच खेळत होता. विरेंद्र मुलासोबत मस्ती करीत होता. अचानक शिवा मागे गेला आणि उकळत्या पाण्यात पडला. यानंतर विरेंद्रने पटकन मुलला उचललं. त्यांनी मुलावर आधी थंड पाणी ओतलं आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले.

हे ही वाचा-5 हजार रुपयांसाठी पत्नीला विकलं, पतीसमोर महिलेचे लचके तोडत राहिले दोन मित्र

उकळत्या पाण्यात पडल्यामुळे लहानग्याच्या पोटासह अनेक अवयव भाजले होते. रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी आणलं होतं. घरातच त्याच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री शिवाचा मृत्यू झाला.

First published:
top videos

    Tags: Death, Madhya pradesh