मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रस्त्यावर आढळला मृतदेह; व्यक्तीच्या कुटुंबीयांना सांगण्यासाठी गेलेल्या गावऱ्यांना घरात दिसलं भयानक दृश्य

रस्त्यावर आढळला मृतदेह; व्यक्तीच्या कुटुंबीयांना सांगण्यासाठी गेलेल्या गावऱ्यांना घरात दिसलं भयानक दृश्य

Crime News: नंगथला गावातील लोक त्यावेळी हादरले जेव्हा त्यांनी गावातील रमेश कुमारचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहिला. गावातील लोक या घटनेची माहिती देण्यासाठी त्याच्या घरी गेले

  • Published by:  Kiran Pharate

चंदीगड 20 डिसेंबर : एक अत्यंत धक्कादायक बातमी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील 5 जण मृतावस्थेत आढळले (5 Persons of Family Found Dead) आहेत. ही धक्कादायक घटना हिसार जिल्ह्याच्या नंगथला गावात घडली. नंगथला गावातील लोक त्यावेळी हादरले जेव्हा त्यांनी गावातील रमेश कुमारचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहिला. गावातील लोक या घटनेची माहिती देण्यासाठी त्याच्या घरी गेले. मात्र, घरात त्याच्या घरातील सर्व सदस्यांचे मृतदेह पडल्याचं आढळून आलं.

पुणे: दोन महिनेही टिकला नाही संसार, खून करुन पत्नीचा मृतदेह लटकवला पंख्याला

गावातील लोकांनी लगेचच याबाबत पोलिसांना माहिती दिली. अग्रोहा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस तपास करत आहेत, की घरातील लोकांची हत्या करून आत्महत्या केली गेली आहे की घरातील सर्वांची कोणीतरी हत्या केली आहे. नंगथला गावात राहणारा रमेश कुमार अग्रोहामध्ये लग्नाची पत्रिका बनवण्याचं काम करत असे. मृत व्यक्तींमध्ये रमेश कुमार ( वय 35), पत्नी सुनीता, त्यांच्या 15 आणि 13 वर्षाच्या दोन मुली आणि एक 10 वर्षाचा मुलगा यांचा समावेश आहे.

दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण जाणून हादराल

रमेशचा मृतदेह घराबाहेर रस्त्यावर पडलेला आढळून आला. तर कुटुंबातील इतर सदस्यांचे मृतदेह घरात आढळून आले. यावरुन असा अंदाज व्यक्त केला जात आहे, की रमेशने आधी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केली आणि यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. मात्र, या प्रकरणाचं पूर्ण सत्य पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याचं सांगत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Suicide