मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'माणुसकीचा मृत्यू'! चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या, रस्त्यावर उभा राहून बघत राहिले लोक, भयानक Video

'माणुसकीचा मृत्यू'! चाकूने सपासप वार करत तरुणाची हत्या, रस्त्यावर उभा राहून बघत राहिले लोक, भयानक Video

गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या करण्यात आली. मृत तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. (Delhi Murder Incident)

गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या करण्यात आली. मृत तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. (Delhi Murder Incident)

गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या करण्यात आली. मृत तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. (Delhi Murder Incident)

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : भररस्त्यात लोकांमध्ये वाद झाल्याच्या किंवा हाणामारी झाल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र, आता एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका 25 वर्षीय युवकाची 4 ते 5 लोकांनी मिळून भररस्त्यात हत्या केली. ही घटना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर परिसातील आहे.

गर्दीच्या ठिकाणी मार्केटच्या मधोमध रस्त्यावरच ही हत्या करण्यात आली. मृत तरुणाने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. मात्र, अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं, की गर्दीच्या ठिकाणी 4 ते 5 लोक मयंकला घेरून त्याच्यावर चाकूने हल्ला करत आहे. आजूबाजूचे लोक मात्र फक्त ही हत्या बघत उभा राहिले आहेत.

Andhra Pradesh Crime : सुनेचं मुंडकं कापून सासूनं पोलीस ठाणे गाठलं, मुंडकं रस्त्यावरून नेताना लोकांचा थरकाप

मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी 25 वर्षीय मयंक मालवीय नगर परिसरातील बेगमपूर येथे आपल्या मित्रासोबत बसला होता. तेव्हाच काहीतरी कारणावरुन मयंकचा 4-5 लोकांसोबत वाद झाला. यानंतर या लोकांनी मयंक आणि त्याच्या मित्रावर दगडाने हल्ला करण्यास सुरूवात केली.

या हल्ल्यानंतर मयंक आणि त्याच्या मित्राने इथून पळ काढला. मात्र, आरोपी मयंकचा पाठलाग करत मालवीय नगर भागातील DDA मार्केटमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी मयंकला घेरलं आणि गर्दीच्या ठिकाणी मार्केटमध्येच त्याच्यावर हल्ला केला.

बॉयफ्रेंडच्या भावासोबत 20 दिवसांचं प्रेम; अन् मुलीने त्याच्याकडून आई-बाबांची केली हत्या

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं, की कशाप्रकारे आरोप मयंकवर चाकूने हल्ला करत आहेत आणि आजूबाजूचे लोक फक्त बघत उभा आहेत. मयंकला गंभीर जखमी करून आरोपींनी तिथून पळ काढला. यानंतर मयंकच्या मित्राने तिथे उपस्थित असलेल्या लोकांत्या मदतीने मयंकला AIIMS मध्ये दाखल केलं. मात्र, इथे उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder