लखनऊ, 29 मे : उत्तर प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात विषारी दारूची विक्री सातत्यानं सुरू आहे. 15 दिवसांपूर्वी आंबेडकरनगर, आजमगढ़ आणि बदायूमध्ये विषारी दारूमुळे 28 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी अलीगडमध्ये विषारी दारूकांडमुळे मोठा धक्का बसला आहे. या घटनेत आतापर्यंत 28 जणांना मृत्यू झाला आहे. मोठ्या संख्येने लोक रुग्णालयात उपचार घेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यांबद्दल सांगायचं झालं तर जानेवारी ते मेपर्यंत 28 मेपर्यंत 11 जिल्ह्यात विषारी दारूमुळे 100 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ही घटना प्रतापगड जिल्ह्यातील असो वा आजमगडची. अशा प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर स्थानिक रातळीवर पोलीस आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येतं आणि सरकार आपल्या कर्तव्यातून मागे हटतात. प्रत्येक वेळेस तपास केला जातो. मात्र त्यातून काहीच उत्तर समोर येताना दिसत नाही. गावात येणारी विषारी दारू कुठून येते, याबाबत अद्याप कोणत्याच विभागाकडून विचारण्यात आलं नसल्याचा दावा केला जात आहे. काहींच्या मते अधिकारी आणि पोलिसांंमध्ये काळंबेरं सुरू आहे. त्यातून विषारी दारू गावात आणली जाते, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
हे ही वाचा-सुशील कुमारने कुस्तीपटू सागरवर कसा केला हल्ला? 'त्या' रात्रीचा Exclusive Video
2021 मध्ये विषारी दारूच्या घटना
8 जानेवारी : बुलंदशहरमध्ये विषारी दारूमुळे 5 जणांचा मृत्यू
26 फेब्रुवारी : महोबा जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू
17 मार्च : प्रयागराजमध्ये 9 जणांचा मृत्यू
22 मार्च : चित्रकूट जिल्ह्यात 7 जणांचा मृत्यू
1 एप्रिल : प्रतापगडमध्ये 6 हून अधिक जणांचा मृत्यू
1 एप्रिल : अयोध्या जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू
2 एप्रिल : बदायू जिल्ह्यात दोघांचा मृत्यू
28 एप्रिल : हाथरस जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू
12 मे : आजमगड जिल्ह्यात 18 जणांचा मृत्यू
12 मे : आंबेडकरनगरमध्ये जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू
12 मे : बदायू जिल्ह्यात जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू
28 मे : अलीगड जिल्ह्यात जिल्ह्यात 28 जणांचा मृत्यू
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Crime news