Home /News /crime /

नदीपात्रात 3 मुलांसह पती-पत्नीचे तरंगत होते मृतदेह, कारण ऐकून गाव हादरले

नदीपात्रात 3 मुलांसह पती-पत्नीचे तरंगत होते मृतदेह, कारण ऐकून गाव हादरले

एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्या केल्याने हदगाव शहरावर शोककळा पसरली आहे.

नांदेड, 02 ऑक्टोबर : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या सहस्त्रकुंडावरील भागातील मुरली बंधाऱ्याजवळ उडी मारून एकच कुटुंबातील पती-पत्नी आणि तीन मुलांनी आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक उघडकीस आली आहे.  यापैकी तिघांचे मृतदेह सापडले तर 2 जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. हे कुटुंब मूळचे हदगाव तालुक्यातील कवाना येथील रहिवाशी असल्याचे समजते. मराठवाडा विदर्भ सिमेवर असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा नदी पात्रातील परोटी ग्रामस्थांनी मृतदेह वाहत असल्याचे पाहिले होते. त्यानंतर ग्रामस्थांनीनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन बिटरगाव पोलीस ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी रात्रभर या मृतदेहाचा शोध घेतला. तो मृतदेह सहस्त्रकुंड धबधब्यापासून एक किमी अंतरावर पैनगंगा नदीपात्रात सापडला. युवा सेनेच्या नेत्याची हत्या, महिन्याभराआधी वडिलांचा कोरोनामुळे झाला होता मृत्यू बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये याबाबत आकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या प्रेताची आज ओळख पटली असून, हे प्रेत प्रवीण भगवानराव कवानकर यांचे असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी पोलिसांना दिली होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण भगवानराव कवानकर (वय 42), अश्विनी प्रवीण कवानकर (38), शेजल प्रवीण कवानकर (20), समीक्षा प्रवीण कवानकर(15), सिद्धेश्वर प्रवीण कवानकर(13) हे पाचही जण यवतमाळ येथे गेले होते. दरम्यान त्यांनी 25 सप्टेंबर रोजी विदर्भ हद्दीतून सहस्त्रकुंड भागाकडे येणाऱ्या मुरली बंधाऱ्याजवळ उड्या मारून आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या बापूंचे हे 10 विचार अवलंबले तर आयुष्य बदलेल! याबाबत अधिक माहिती घेतली असता, कवानकर कुटुंबीयांमध्ये संपत्तीचा वाद सुरू होता, अशी चर्चा हदगावमध्ये सुरू आहे. याच वादातून कवाणकर यांनी  जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी  प्रवीण कवानकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला फिरायला जात असल्याचे सांगून घर सोडले. कवानकर कुटुंब यवतमाळ इथं पोहोचले. त्यानंतर मुरली बंधाऱ्याजवळ जाऊन एक-एक करून पाचही जणांनी नदीत उड्या टाकल्या. प्रवीण कवाणकर यांचं प्रेत सहस्त्रकुंड पात्रात तर सिद्धेश्वर आणि अश्विनीचे प्रेत दराती नदीपात्रात आढळून आल्याचे  सांगण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्या केल्याने हदगाव शहरावर शोककळा पसरली आहे. कवानकर कुटुंबातील पाच सदस्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे असून दोघांचा शोध सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: यवतमाळ

पुढील बातम्या