पालघर, 13 फेब्रुवारी: पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 48 वर्षीय नराधमाने गावातील एका तरुणीसोबत विकृतीचा कळस गाठला आहे. आरोपीनं पीडित तरुणीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. गर्भवती राहिल्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईनं मनोर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
मनोर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड याठिकाणी घडली आहे. तर पीडित तरुणी ही मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. गावातील 48 वर्षीय नराधम आरोपी तिच्या मतिमंदपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार (rape on mentally disable woman) करत होता.
हेही वाचा-ट्रेनमध्ये एकट्याने प्रवास करणाऱ्या तरुणीसोबत संतापजनक कृत्य, नराधमाला बेड्या
पीडितेनं विरोध केला असता आरोपी तिला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. मागील 5 महिन्यांपासून आरोपीनं वेळोवेळी पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केले आहेत. दरम्यान पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. पीडितेसोबत घडलेलं कृत्य ऐकून आईलाही धक्का बसला आहे. घडलेला प्रकार कळताच पीडित तरुणीच्या आईनं तातडीने मनोर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा-बेपत्ता विवाहितेसोबत घडलं विपरीत; विहिरीत आढळली मृत, बुलडाण्यातील खळबळजनक घटना
पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Palghar, Rape