मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /47 वर्षीय व्यक्तीचे 19 वर्षांच्या तरुणासोबत लैंगिक संबंध, VIDEO रेकॉर्ड करून मागितले पैसे, पण घडलं भयंकर!

47 वर्षीय व्यक्तीचे 19 वर्षांच्या तरुणासोबत लैंगिक संबंध, VIDEO रेकॉर्ड करून मागितले पैसे, पण घडलं भयंकर!

आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्याने पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि

आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्याने पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि

आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्याने पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 17 एप्रिल :  एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना बुलडाणा जिल्ह्यात घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणासोबत समलैंगिक संबंध (homosexuality ) ठेवले आणि त्याचे चित्रिकरण केले. त्यानंतर खंडणी मागितली पण पैसे दिले नाही म्हणून एका  47 वर्षीय कक्षसेवकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा (buldhana) शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. खून करणाऱ्या ७ आरोपी विरुद्ध बुलडाणा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  श्रीराम पांडुरंग शेळके (४७, मुळ रा. कासोदा, ता.सिल्लोड, ह.मु धामणगाव बढे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपासून श्रीराम शेळके बेशुद्धअवस्थेत मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या कमानीजवळ एका मोकळ्या शेतात आढळून आले होते. पोलिसांनी त्यांना  जखमी अवस्थेत उपचाराकरिता आधी बुलडाणा व त्यानंतर औरंगाबाद येथे हलवले होते. औरंगाबाद येथे उपचारादरम्यान श्रीराम शेळके याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

पोलिसांनी तपासादरम्यान मृतक श्रीराम शेळके यांच्या कुटुंबीयांची व तो काम करत असलेल्या ठिकाणच्या  कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यावेळी गेल्या तीन महिन्यांपासून श्रीराम शेळके याला सतत कुणाचा तरी फोन यायचा तो त्यावर सतत बोलायचा आणि त्यानंतर अस्वस्थ व्हायचा असे  पोलिसांसमोर आले. दरम्यान पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत महत्वपूर्ण माहिती गोळा केली. त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

(नेश कार्तिक टीम इंडियाकडून पुन्हा खेळणार? वाचा, काय दिलं विराटनं उत्तर)

मृतक श्रीराम शेळके हा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कक्षसेवक पदावर कार्यरत होते. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय जवळील शहरातील सावित्रीबाई फुले नगरात राहणाऱ्या आनंद गवई (१९) याच्याशी काही महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकवरून ओळख झाली होती. दोघांमध्ये फेसबुकवर चॅटिंग होत होती. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मोबाईलवर आनंद आणि श्रीराम यांचे सातत्याने बोलणे व्हायचे. दोघांमध्ये व्हॉट्स ॲपवरून समलैंगिक संदेश , फोटो व व्हिडिओची देवाणघेवाण होत होती. त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक निर्माण झाली होती.आनंद श्रीरामने बुलडाण्याला भेटायला बोलावले होते.

खामगाव रोडवरील कोठारी शोरुमजवळ दोघांची भेट झाली. त्यादिवशी आनंदचा मित्र शाश्वत खंदायता यांच्या घरी कुणी नसल्याने घराची चाबी आनंदने घेतली होती. त्यानंतर दोघेही शाश्वतच्या घरी गेले. आनंदचा मित्र आदेश राठोड याला ही बाब माहीत झाल्याने त्याने हा प्रकार शाश्वतला सांगितला. आदेश आणि  शाश्वतने घराच्या मागच्या दरवाजाने गुपचूप प्रवेश केला. त्यावेळी आनंद आणि श्रीराम यांच्यात समलैंगिक संबंध सुरू असल्याचे त्याने पाहिले. या संबंधाचे त्यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले आणि त्यानंतर लगेच खोलीत शिरून तो व्हिडीओ श्रीराम शेळके याला दाखवला आणि व्हिडिओ व्हायरल करायचा नसेल तर पैशांची मागणी केली.

श्रीरामने  पैसे द्यायला नकार दिल्याने आदेश आणि  शाश्वतने त्यांचे मित्र चेतन वावरे  संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांना तिथे बोलावले. सगळ्यांनी मिळून श्रीरामला बेदम मारहाण केल्याने रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्या अंगातील रक्ताने माखलेला शर्ट काढून शाश्वतच्या घरातील दुसरा शर्ट त्याच्या अंगात चढवला. त्यानंतर  बेशुद्धावस्थेतील श्रीरामला शाश्वतच्या चारचाकी वाहनात टाकून मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या मोकळ्या शेतात टाकून दिले. तिथेच श्रीरामची मोटर सायलकल सुद्धा आरोपींनी उभी करून दिली आणि श्रीरामच्या अंगातील रक्ताने माखलेला शर्ट जाळून टाकला. फिरायला गेलेल्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी जखमी श्रीरामला आधी बुलडाणा व त्यानंतर औरंगाबाद उपचारा करीता रेफर केले होते.  दरम्यान दुसऱ्या दिवशी आरोपींनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तिथे मोटरसायकल आणि श्रीराम दिसला नाही. त्यामुळे तो शुद्धीत येऊन घरी निघून गेला असावा असे आरोपींना वाटले त्यामुळे ते गाफील राहिले. मात्र औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान श्रीरामचा मृत्यू झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी हा तपास हाती घेतला. श्रीरामच्या कुटुंबीयांचा, त्याच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदविल्यानंतर हा घातपात असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले.

(हनुमान चालिसा प्रकरणावरुन वादंग; शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याला दिला हा इशारा)

तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आधी संशयित म्हणून आनंद गवईला ताब्यात घेतले.त्याच्या  चौकशीनंतर त्याने सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी व त्यांच्या पथकाने उर्वरित ६ आरोपींना एकाच वेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. सर्व आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केला. आज याप्रकरणी आनंद गवई, शाश्वत खंदायता, आदेश राठोड, चेतन वावरे, संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published: