Home /News /crime /

'44 जणांनी केला बलात्कार'; निर्भया केंद्रावर 17 वर्षाच्या मुलीने व्यक्त केला भयंकर अनुभव, 24 आरोपी मोकाटच!

'44 जणांनी केला बलात्कार'; निर्भया केंद्रावर 17 वर्षाच्या मुलीने व्यक्त केला भयंकर अनुभव, 24 आरोपी मोकाटच!

ज्या देशात महिलेची देवी मानून पूजा केली जाते, त्याच देशात आजही मुलीच्या शरीराचे लचके तोडणारे नराधम गुन्ह्यानंतरही मोकाट फिरत आहेत

    तिरुवनंतपुरम, 19 जानेवारी : केरळमधील (Keral) एका 17 वर्षांच्या पीडित मुलीने आपला अनुभव सांगितल्यानंतर तुमच्या पायाची जमीन सरकेल. देशातील सुशिक्षितांची टक्केवारी वाढली तर अद्यापही बलात्काराच्या घटना वाढतच आहे. दिल्लीमधील निर्भय घटनेने सर्वांनाच जबर धक्का बसला होता. त्यानंतर पुन्हा असाच अत्यंत क्रुर आणि लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक महिन्यात या 17 वर्षीय मुलीवर 44 जणांनी बलात्कार केला. (44 people raped 17 year old girl expresses horrible experience) निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊंन्सिलींगदरम्यान तिने हा धक्कादायक खुलासा केला. ही मुलगी गेले अनेक महिना हा त्रास...अत्याचार सहन करीत होती. खळबळजनक बाब म्हणजे यापैकी कित्येक लोक अद्याप बाहेर मोकाट फिरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीने निर्भया केंद्रावर काऊन्सिलिंगदरम्यान ही बाब व्यक्त केली. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पल्लकडमध्ये एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीच्या आरोपाखाली 44 पुरुषांविरोधात 32 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी केवळ 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तर उरलेल्या 24 जणांचा शोध सुरू आहे.(44 people raped 17 year old girl expresses horrible experience) हे ही वाचा-अभ्यासावरुन बापाने मुलाला दिली भयंकर शिक्षा; कान पकडून उठाबशा काढायची आली वेळ आतापर्यंत 20 जणं ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात ज्या लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींपैकी अनेक जण न्यायालयीन अटकेत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. केरळमध्ये बलात्काराचे धक्कादायक आकडे केरळमध्ये गेल्या काही दिवसात बलात्काराच्या अनेक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे. एका रिपोर्टनुसार 100 टक्के शिक्षित लोकसंख्या असलेलं राज्य बलात्काराच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे. (44 people raped 17 year old girl expresses horrible experience) तेथे प्रती लाख लोकसंख्येत 11.1 महिलांवर बलात्कार झाला आहे. तेथे 15.9 च्या दरात राजस्थान या लिस्टमध्ये टॉपवर आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kerala, Rape

    पुढील बातम्या