• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! जबरदस्ती करत होता युवक; महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! जबरदस्ती करत होता युवक; महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

एका व्यक्तीने महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual molestation) करण्याचा प्रयत्न केला असता, पीडित महिलेनं संबंधित व्यक्तीचं गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  सीधी, 20 मार्च: एका व्यक्तीने महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexual molestation) करण्याचा प्रयत्न केला असता, पीडित महिलेनं संबंधित व्यक्तीचं गुप्तांग (Women cut mans private part) कापल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं आरोपीचं गुप्तांग कापल्यानंतर स्वतः हून पोलीस ठाण्यात हजर झाली आहे. तिने आपली इज्जत वाचवण्यासाठी हा हल्ला केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीने आणि पीडित महिलेनं एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने या घटनेचं गौडबंगाल कायम आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात तक्रार दाखल केली असून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. खड्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी उप निरिक्षक धर्मेंद्र सिंह राजपूत यांनी सांगितलं की, संबंधित घटना सीधी जिल्ह्यातील उमरीहा या गावातील आहे. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास 45 वर्षीय आरोपी रमेश साकेत पीडितेच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने पीडित महिलेवर बलात्कार करण्याच्या हेतुने जबरदस्ती करू लागला. यावेळी पीडित महिलेनं त्याचा विरोध केला असता आरोपीने तिला मारायला सुरुवात केली. त्यानंतर तिने आपला जीव आणि इज्जत वाचवण्यासाठी हे धक्कादायक पाऊल उचललं आहे. पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाली पीडित महिला पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, आरोपीने तिला घट्ट पकडलं होतं. ती स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला सुटका करून घेता येत नव्हती. यावेळी पीडितेनं पलंगावर असलेल्या विळ्याने रमेशच्या गुप्तांगावर वार केला. त्यानंतर पीडित महिलेनं स्वतः पोलीस चौकी गाठली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उप निरिक्षक राजपूत यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी व्यक्तीला सेमरिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर आरोपी व्यक्तीला पुढील उपचारासाठी रीवा येथील संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे. (वाचा-पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातली घटना) आरोपीने महिलेविरूद्ध दिली तक्रार पोलिसांनी सांगितलं की, आरोपी व्यक्तीविरोधात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच बलात्कारातील आरोपीच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस सखोल तपास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: