नवी दिल्ली, 2 मे : येथील समयपूर बदली (Samaypur Badli) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 40 वर्षाच्या नराधमाने आणखी एका आरोपीसह मिळून सहा महिन्यांच्या निष्पाप जीवावर बलात्कार (Minor raped) केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानतंर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तर आरोपीच्या मित्राने 6 महिन्यांच्या मुलीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केला आहे. जेव्हा पोलीस आरोपीला पकडण्यासाठी घटनास्थळी पोहोचली तेव्हा आरोपीने पोलिसांवर फायरिंगही करण्याचा प्रयत्न केला. कमल मल्होत्रा उर्फ चीनू असे आरोपीचे नाव आहे. तो जगांगीरपुरी येथील रहिवासी आहेत.
दोन मित्रांनी केले दोन बहिणींसोबत दुष्कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका महिलेने केले होती. महिलेने सांगितले की, ती एका कामाच्या निमित्ताने घराबाहेर होती. तर तिच्या दोन मुली एक 14 वर्षांची तर दुसरी सहा महिन्याची, या दोन्ही मुली घरी एकट्या होत्या. 14 वर्षीय मुलीची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. जेव्हा महिला घरी पोहोचली तर तिला तिच्या मुली घरात आढळल्या नाहीत. त्यामुळे ती घाबरली आणि तिने आपल्या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. याचदरम्यान, या महिलेला शेजारुनच तिच्या मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. जेव्हा ती महिला तिथे पोहोचली तेव्हा आरोपी चिनू आणि त्याचा मित्र राजू तिच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे आढळले. महिलेला पाहिल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.
यानंतर दोन्ही मुलींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तक्रारीनंतर आरोपींवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी आरोपी चिनूला समयपूर बादली मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या एका पार्कमधून अटक केली आहे. पोलीस तिथे पोहोचल्यावर त्यांनी चिनूला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्याने ते मान्य केले नाही आणि पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला. तर यानंतर पोलिसांनीही त्याला प्रत्यत्तर दिले. यात त्याच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनू मजदूरीचे काम करत होता. मात्र, आता सध्या तो बेरोजगार आहे. जेव्हा दोघांनी दुष्कृत्य केले तेव्हा ते दोघे नशेत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Delhi, Rape news, Rape on minor