मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, रिक्षातून जप्त केल्या तब्बल 40 तलवारी, VIDEO

मालेगाव पोलिसांची मोठी कामगिरी, रिक्षातून जप्त केल्या तब्बल 40 तलवारी, VIDEO

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कुठून व कुणाकडून आणण्यात आल्या?

  • Share this:

मालेगाव, 02 डिसेंबर : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावमधील मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. एका रिक्षामधून तब्बल 40 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. एका खबऱ्याकडून शहरामध्ये मोठा शस्त्रसाठा येणार अशी माहिती मिळाली होती. खबऱ्याच्या माहितीच्या आधारावर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने एक विशेष पथक तयार करण्यात आले.

या विशेष पथकाने  मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचला. महामार्गावर वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा एक संशयास्पद हालचाल करताना रिक्षाचालक दिसला. पोलिसांनी या रिक्षाला थांबवले आणि तपासणी केली असता शस्त्रसाठा आढळून आला. या रिक्षातून तब्बल 40 तलवारी जप्त केल्या आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये चीनचा डाव उघड, या 2 कारणांसाठी भारतासोबत केला तणाव

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारी कुठून व कुणाकडून आणण्यात आल्या? कशासाठी आणण्यात आल्या आणि कुणाला दिल्या जाणार होत्या, असा सवाल यानिमित्ताने उपस्थितीत झाला आहे.

या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

नऊ वर्षांच्या मुलाची अपहरण करून हत्या

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सामनगाव रोडवर गाडेकर मळ्यात एका नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण केलेल्या चोरीची कुठे वाच्यात होऊ नये या भीतीने शेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

एकनाथ खडसे शरद पवारांना वाढदिवसाला देणार अनोखं गिफ्ट, मोर्चेबांधणी सुरू

रामजी लालबाबू यादव (वय 9) असं मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारपासून रामजी लालबाबू यादव बेपत्ता होता.  घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला सिन्नर इथं सोडतो म्हणून गाडीत बसवले होते. त्यानंतर काही अंतर दूर गेल्यावर त्याने प्रवाशाकडून मोबाइल फोन आणि 4 हजार रुपये लुटले होते. हा सर्व प्रकार मृत रामजी यादव या चिमुरड्याने पाहिला होता. आपण केलेली लूट कुणाला सांगू नको, अशी धमकी या तरुणाने मृत चिमुरड्याला दिली होती. पण,  चिमुरडा कुठे तरी वाच्यात करेल या भीतीने या तरुणाने  चिमुरड्याला बाहेर फिरायला घेऊन जातो सांगून डुबेरे गावातील बंधार्‍यात गळा दाबून खून केला. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 2, 2020, 5:29 PM IST
Tags: malegaon

ताज्या बातम्या