बेंगळुरु 07 जून : फूड डिलिव्हरी ( Swiggy Delivery Boy) करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची एक घटना समोर आली आहे. जेवण ऑर्डर (Food Order) केलेल्या चार जणांनी कार्तिक नावाच्या 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयला मारहाण केली आहे. या व्यक्तींनी जेवण मागवलं मात्र नंतर त्यांना ऑर्डर कॅन्सल करता आली नाही. यामुळे ऑर्डर घेऊन पोहोचलेल्या कार्तिकला ते मोफत ही ऑर्डर मागू लागले. ही घटना कार्तिकच्या एका मित्रानं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली, यानंतर अनेकांनी ही पोस्ट शेअर केली. घटना बेंगळुरुच्या राजाजीनगर येथील आहे.
द न्यूज मिनिटनं दिलेल्या वृत्तानुसार, वसीम नावाच्या एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली आहे. तसंच कार्तिकचं यात नुकसान झालं असून त्याच्या मदतीसाठी पैसे देण्याचं आवाहन लोकांना केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कार्तिकनं ऑर्डरसाठीचे पैसे ग्राहकाकडे मागितले, तेव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यानंतर सुमारे 20 वर्ष वय असणाऱ्या चार तरुणांनी कार्तिकला शिवीगाळ कऱण्यास सुरुवात केली. कार्तिकनं याचा विरोध करताच चौघांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्याच्या डोक्यावर दगडानं मारण्यात आलं. यानंतर कार्तिक बेशुद्ध होऊन पडला.
इतर डिलिव्हरी वर्कर्सनं कार्तिकला या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आणि कार्तिकला रुग्णालयात घेऊन गेले. इतर लोक येत असल्याचं पाहाताच आरोपी याठिकाणाहून फरार झाले. रिपोर्टनुसार, या घटनेत कार्तिकच्या मोबाईलचं आणि गाडीचंही नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर चारही आरोपी कार्तिकच्या खिशातून 1,800 रुपये घेऊन फरार झाले आहेत. हे पैसे त्यानं आपल्या बहिणीच्या लग्नातील खरेदीसाठी जपून ठेवले होते.
प्रत्यार्पण टाळण्यासाठी मेहुल चोक्सीनं लढवली होती 'ही' शक्कल
बहिणीच्या लग्नामुळे कार्तिक पोलिसात तक्रार न करताच आपल्या बहिणीच्या लग्नासाठी चित्तूरमधील आपल्या घरी निघून गेला होता. द न्यूज मिनिटसोबत बातचीत करताना कार्तिकनं सांगितलं, की पोलीस माझी भरपूर मदत करत आहेत. ते सतत माझ्या संपर्कात आहेत. बुधवारी बेंगळुरुमध्ये परत जात तक्रार दाखल करणार आहे. Swiggy नं म्हटलं आहे, की ते जेवण ऑर्डर केलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलिसांना देतील.
Sagar Dhankar Murder: सुशील कुमार जेलमध्ये अर्धपोटी, विशेष खुराकची मागणी
कार्तिकनं सांगितलं, की मदतीच्या आवाहानानंतर त्याला त्याच्या गरजेपेक्षा अधिक पैसे मिळाले आहेत. त्यामुळे, उरलेले पैसे चांगल्या कामात दान करणार असल्याचं त्यानं म्हटलं. Swiggy नं कार्तिकला उपचारासाठी कंपनीच्या हेल्थ इन्शयूरन्सचा वापर करण्यास सांगितलं आहे. सोबतच कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं आहे. पोलिसांनी सांगितलं, की याप्रकरणी आम्ही Swiggy सोबतही संपर्कात आहोत आणि कार्तिकनं एफआयआर दाखल करताच प्रकरणाचा तपासा सुरू करणार आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.