मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

500 रुपयांची नोट, चाकूचे 25 वार अन् CCTV फुटेज; दुकानदाराच्या हत्येप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना अटक

500 रुपयांची नोट, चाकूचे 25 वार अन् CCTV फुटेज; दुकानदाराच्या हत्येप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना अटक

सुरुवातीच्या तपासातच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. त्यामुळे चारही आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. (4 Minors Killed Shopkeeper)

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 21 ऑगस्ट : राजधानी दिल्लीत दुकानदाराच्या हत्येप्रकरणी 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. दुकानदाराने त्यांच्याकडील 500 रुपयांची फाटलेली नोट घेण्यास नकार दिल्यानेच आरोपींनी त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण दिल्लीतील भजनपुरा भागातील आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सर्व आरोपी किराणा दुकान चालवणाऱ्या शाहनवाज यांच्याकडे आले आणि त्यांनी 25 हून अधिक वार करून शाहनवाजची हत्या केली. मृताच्या हातावर, डोक्यावर आणि छातीवर चाकूच्या खुणा आढळल्या आहेत.

सुरुवातीच्या तपासातच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. त्यामुळे चारही आरोपींची ओळख पटली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तपासादरम्यान आरोपी फाटलेली नोट घेऊन दुकानदार शाहनवाजकडे गेले होते, असं समोर आलं. मात्र शाहनवाजने ही नोट घेण्यास नकार दिला.

वय अवघं 22 वर्ष, उसनवारीचे पैसे फेडू न शकल्याने खचला, बुलढाण्यात युवकाचं धक्कादायक कृत्य

शहानवाजने नोट घेण्यास नकार तर दिलाच शिवाय दुकानात आलेल्या या मुलांना तिथून हुसकावूनही लावलं. यादरम्यान शाहनवाज आणि अल्पवयीन मुलांमध्ये बाचाबाची झाली. याचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलांनी कट रचला आणि गुरुवारी रात्री संधी पाहून शहानवाजवर चाकूने हल्ला केला.

पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू आणि चोरीच्या दोन स्कूटर जप्त केल्या आहेत. या परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरोपी चाकू ठेवायचे आणि लोकांना धमकावत असे, असंही चौकशीत समोर आलं आहे. या चार आरोपींपैकी दोघे नववीचे, एक आठवीचा तर एक अकरावीचा विद्यार्थी आहे.

एका मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराचे वागणे बदलले अन् विवाहित प्रेयसीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शाहनवाज (३०) हा मूळचा बिहारमधील सीतामढी येथील होता. तो भजनपुरा येथील सुभाष मोहल्ला येथे कुटुंबासह राहत होता. तिथे तो जवळच किराणा दुकान चालवत असे. शाहनवाजच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घरातील सदस्यांची अवस्था बिकट आहे. शाहनवाज यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मृताच्या भावावरही चाकूने हल्ला करण्यात आला होता, त्यात त्यांचा जीव वाचला होता, असं सांगण्यात येत आहे.

First published:

Tags: Crime news, Murder