मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अचानक गावातून 4 अल्पवयीन मुले बेपत्ता, वर्धा जिल्ह्यात खळबळ

अचानक गावातून 4 अल्पवयीन मुले बेपत्ता, वर्धा जिल्ह्यात खळबळ

गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  sachin Salve

नरेंद्र मते, प्रतिनिधी

वर्धा, 25 सप्टेंबर : राज्यात मुलं बेपत्ता होण्याच्या अफवांना पेव फुटला आहे. अशातच वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये 4 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मसाळा इथं ही घटना घडली आहे. मसाळा येथील पप्पू देवढे (वय 13 वर्ष), राज येदानी (वय 13), राजेंद्र येदानी (वय 12), संदीप भुरानी (वय 8) अशी बेपत्ता मुलांची नाव आहे. शनिवारी पप्पू देवढे याला शाळेतून सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांनी घरी आणले होते. त्यानंतर पप्पू देवढेचे वडील शेतात निघून गेले.

त्यानंतर कामावरून सायंकाळी पाच वाजता दरम्यान घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पालकांमध्ये एकच घबराट पसरली. गावभर शोध घेऊन मुलांचा शोध लागला नाही. त्यानंतर पालकांनी सेलू पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पप्पू देवढेच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहे.

नाशिकमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून तरुणांना मारहाण

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या मुलं पळवणाऱ्या टोळी संबंधित चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुलं पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. नाशिकमध्ये या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नाशिक शहरात दोन दिवसांत मुलं चोरण्याच्या संशयावरून मारहाणीच्या तीन घटना समोर आल्या आहेत.

नाशिकमध्ये पुन्हा मुलं चोर समजून मारहाण झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यात प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आली. प्रियकर तरुण बुरखा घालून आल्याने जमावाने मुलं चोर समजून त्याला बेदम मारहाण केली. नाशिकच्या वडाळा गावात ही घटना घडली.

First published: