मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सारखं भुंकते म्हणून कुत्रीला शेडमध्ये नेऊन मारलं, इंजिनीअरिंगच्या 4 विद्यार्थ्यांचं भयावह कृत्य VIDEO

सारखं भुंकते म्हणून कुत्रीला शेडमध्ये नेऊन मारलं, इंजिनीअरिंगच्या 4 विद्यार्थ्यांचं भयावह कृत्य VIDEO


मैदानावर तरुण खेळत असताना ती कुत्री त्यांच्यावर भुंकत असल्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय त्या तरुणांनी घेतला.

मैदानावर तरुण खेळत असताना ती कुत्री त्यांच्यावर भुंकत असल्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय त्या तरुणांनी घेतला.

मैदानावर तरुण खेळत असताना ती कुत्री त्यांच्यावर भुंकत असल्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय त्या तरुणांनी घेतला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : क्रिकेट खेळत असताना एक गर्भार कुत्री सतत मैदानावर येऊन भुंकत असल्याने त्रस्त झालेल्या इंजिनीअरिंगच्या चार विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण करून त्या कुत्रीचा जीव घेतला. धक्कादायक म्हणजे, एका टीनशेडमध्ये लाकडी दांडा व स्टंपने अमानुष मारहाण करण्यात आली. तिथं उपस्थित असलेले काही तरुण ‘कुत्रीला मारून टाक’ असं म्हणत असल्याचं व्हिडिओत ऐकू येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत ही घटना घडली. पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना अटकही केली आहे. कुत्रीला ठार करण्याची घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली.  मारून टाकण्यात आलेली कुत्री नेहमी याच भागात फिरत होती.

मैदानावर तरुण खेळत असताना ती कुत्री त्यांच्यावर भुंकत असल्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय त्या तरुणांनी घेतला. काही वेळ त्या कुत्रीच्या मागे सर्व तरुण धावले व नंतर एका टीन शेडमध्ये नेऊन त्या कुत्रीला लाकडी दांडा आणि दगडाने ठेचले. यात त्या कुत्रीचा प्राण गेला. त्यानंतर जवळच असलेल्या एका शेतात त्या कुत्रीला नेऊन पुरण्यात आले. पोलिसांनी कुत्रीचा मृतदेह उकरून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार ती कुत्री गर्भार होती.

(तरुणीला प्रायव्हेट पार्टवर ब्लेडनं लिहायला लावलं, माथेफिरुला पोलिसांनी केलं अटक)

व्हिडिओ व्हायरल होताच दिली तक्रार

थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने शनिवारी (19 नोव्हेंबर) पोलिसांत तक्रार दिली. न्यू फ्रेंड्रस कॉलनीत त्या कुत्रीला मारून टाकण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करत चार आरोपी तरुणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही विद्यार्थी हे डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्युटचे विद्यार्थी आहेत. घटना घडली तेव्हा तयार करण्यात आलेल्या व्हिडिओत 10 ते 20 लोक दिसत आहेत. हे लोक टीन शेडमध्ये कुत्रीला मारहाण करत आहेत. यातील काहीजण तर ‘मारा, मारा’ असे ओरडत असल्याचे ऐकू येते. यानंतर कुत्रीला फरपटत शेतात नेऊन टाकत असल्याचे दिसते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी व्हिडीओ फुटेजची तपासणी करण्यात आली. यात मारहाण करणाऱ्या चार आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आग्नेय विभागाच्या पोलीस उपायुक्त ईशा पांडे म्हणाल्या की, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस डॉन बास्को टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये जाऊन आले. परंतु सुट्या असल्याने तिथे कुणी सापडले नाही. त्यानंतर पोलिसांनी संचालकांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले.

(श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली 'ती' परिस्थिती...)

पण त्याचवेळी एक व्यक्तीने समोर येत तक्रार दिली. मारहाण करणाऱ्यात अविनाश मिंज (24) असल्याचं सांगितलं. महाविद्यालयातून याची सर्व माहिती काढून पोलिसांची टीम त्याच्या घरी गेली. पण तो तिथं नव्हता व मोबाइल फोनही स्वीच ऑफ होता. पण नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला. त्यानं दिलेल्या माहितीवरुन कुत्रीचे मृत शरीर सापडले. अविनाशसोबत असलेल्या अनीश होरहोरिया, राहुल कुजूर आणि गुरुवचन यांनाही अटक करण्यात आली.

First published:

Tags: Marathi news