मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /14 वर्षांच्या मुलीने जे लिहिलं ते वाचून डोळ्यात येईल पाणी, सुसाइड नोटमध्ये 4 मृत्यूबाबतचं सत्य..

14 वर्षांच्या मुलीने जे लिहिलं ते वाचून डोळ्यात येईल पाणी, सुसाइड नोटमध्ये 4 मृत्यूबाबतचं सत्य..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

4 मृत्यूंबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bageshwar, India

रोहित भट्ट, प्रतिनिधी

बागेश्वर, 19 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहेत. देशात हत्या, बलात्कार, तसेच अनैतिक संबंधाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

17 मार्च रोजी उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील जोशीगावमध्ये एकाच घरात चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. महिला आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह ज्या अवस्थेत आहेत, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. भोपाल राम याची पत्नी नंदी देवी, मोठी मुलगी अंकिता (14), मुले कृष्णा (7) आणि भावेश (1) अशी मृतदेहांची नावे आहेत.

भोपाल राम तो येथे भाड्याने राहत होता. बागेश्वर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून शनिवारी खुलासा केला. आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अंकिताने तिच्या पुस्तकात 12 पानी सुसाईड नोट लिहिल्याने याबाबत धक्कादायक माहिती समोर आली. अंकिताने लिहिलेले शब्द वाचून सर्वांचे डोळे ओलावले.

पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अंकिताने लिहिले की, तिची आई सल्फास घेऊन आली होती. आर्थिक चणचण आणि जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे कुटुंब त्रस्त होते. ज्या लोकांकडून त्याने कर्ज घेतले होते ते त्यांना त्रास देत असत आणि वारंवार घरी येऊन पैशाची मागणी करत होते. अशा परिस्थितीत तिची आई मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होत होती. याशिवाय तिचे वडीलही खूप नाराज होते.

Dog Story : कुत्रा भूंकला म्हणून शेजाऱ्याचे नियंत्रण सुटले, लाठीने केली जोरदार पाहा VIDEO

तो 1 मार्चपासून तो घरी आला नव्हता. अंकिताने सुसाईड नोटमध्ये पुढे लिहिले की, लोक पैसे मागण्यासाठी घरी पोहोचत होते, त्यासाठी तिने स्थानिक पोलिसांना मदतीची विनंती देखील केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटवर तातडीने कारवाई करत एसपी बागेश्वर यांनी एसएचओसोबत संपर्क घेतला.

बागेश्वरचे एसपी हिमांशू वर्मा यांनी सांगितले की, कुटुंबाची परिस्थिती अशी नाही की ते रेशन खरेदी करू शकतील. तर पोलिसांनी भोपाल राम याला शोधून काढले आहे. त्याने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी त्याच्याकडे एक मोबाइल होता. मात्र, आर्थिक अडचणींमुळे तो मोबाइलही विकला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेवर गुन्हाही दाखल केला आहे. भोपाल रामने रीमा येथे राहणाऱ्या महिलेकडून काही पैसे घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

First published:

Tags: Death, Local18, Uttarakhand