सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप, बीड कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 नराधमांना मरेपर्यंत जन्मठेप, बीड कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज बीड जिल्हा सत्र मुख्य न्यायालयाने सुनावली आहे.

  • Share this:

बीड, 22 ऑक्टोबर : एकट्या महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज बीड जिल्हा सत्र मुख्य न्यायालयाने सुनावली आहे. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. यात जिजा लालसिंग राठोड (वय 30), अमोल मदन काष्टे (30), पुंडलिक बन्सी राठोड (27), नवनाथ बाबुराव जाधव(28) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

अजितदादांच्या प्रकृतीबद्दल पार्थ पवारांनी दिली माहिती,'त्या' वृत्ताचे केले खंडन

ही घटना 2015 मध्ये घडली होती. पीडित महिला शेतातून घरी बीडकडे येत होती. त्यावेळी आरोपींनी  पीडितेला जीपमध्ये बसून नेत निर्मनुष्य ठिकाणी नेत आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. नंतर मध्यरात्री पीडितेच्या गावाकडील घरी येऊन दरवाजा तोडून घरांमध्येही देखील बलात्कार केला होता.

या प्रकरणात आज बीड जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत महाजन यांनी चार आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच दोषींना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणामुळे पीडितेला न्याय मिळाला असून यात सरकारी वकील म्हणून मिलिंद वाघिरकर यांनी काम पाहिले.

देशातला सर्वात मोठा दरोडा, रात्री 2 वाजता लुटले MI चे 15 कोटी रुपयांचे मोबाईल

सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशी शिक्षा दिल्याने गुन्हेगारांमध्ये जरब बसेल असा विश्वास देखील न्यायालयाने व्यक्त केला.

Published by: sachin Salve
First published: October 22, 2020, 2:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या