39 वर्षीय महिलेला 21 वर्षाच्या तरुणावर जडलं प्रेम; अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा

39 वर्षीय महिलेला 21 वर्षाच्या तरुणावर जडलं प्रेम; अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीचा असा काढला काटा

Crime news Kolhapur: 39 वर्षीय एका महिलेचं 21 वर्षाच्या एका तरुणाशी प्रेम जडलं (Immoral Relation) होतं. त्यामुळे पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या (Husband Murder) केली आहे.

  • Share this:

हुपरी, 01 मार्च: अनैतिक संबंधात (immoral relationship) बाधा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पत्नीने आपला प्रियकर आणि त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने 50 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. यानंतर पतिचा मृतदेह एका लोखंडी पेटीत घालून कोगनोळी येथील एका ओढ्यात फेकून दिला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नीसह दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत 50 वर्षीय व्यक्ती महंमद बंडू जमादर हे कोल्हापूर जवळील हातकणंगले तालुक्यातील  पट्टणकोडोली येथील तळंदगे फाटा वसाहतीत पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांचा पट्टणकोडोली याठिकाणी स्क्रपचा व्यवसाय आहे. तर त्यांची 39 वर्षीय पत्नी तहसिम जमादार हिचे हुपरी येथील रहिवाशी असणाऱ्या 21 वर्षीय सचिन गजानन मगदूम याच्याशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही काळापासून त्यांचं एकमेकांवर प्रेम झडलं होतं. त्यांना एकमेकांसोबत राहायचं होतं. मात्र विवाहित महिलेचा पती यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता.

असा काढला पतीचा काटा

यामुळे आरोपी पत्नीने आपल्या पतिचा काटा काढायचा ठरवलं होतं. त्यानंतर तिने आपला प्रियकर आणि त्याच्या काही साथीदाराच्या मदतीने 50 वर्षीय पती महंमद बंडू जामदार यांच्या हत्येचा कट रचला. कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत संशयित आरोपी सचिन व त्याच्या दोन साथीदारांनी महंमद यांना कारने कागल याठिकाणी घेवून गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी महंमद यांचा क्लच केबलने गळा आवळून खून केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी मृतदेह एका लोखंडी पेटीत भरून मृतदेह कर्नाटक हद्दीतील कोगनोळी हंचनाळ येथील एका ओढ्यात टाकला.

हे ही वाचा -नाव बदलून तरुणीशी ठेवले शारीरिक संबंध; गरोदर झाल्यानंतर असं फुटलं बिंग

मृत महंमद जमादार 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने हुपरी पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी तहसिम जमादार (वय- 39), सूरज महमंदहानिफ शेख (वय- 21, रा. कागल) व सौरभ पांडुरंग पाटील (वय-21 रा. कोल्हापूर) या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि प्रियकर सचिन गजानन मगदूम अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून पुढील कारवाई केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: March 1, 2021, 10:32 AM IST

ताज्या बातम्या