मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भिवंडी हादरली, 38 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

भिवंडी हादरली, 38 वर्षीय नराधमाचा 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी होती, याच बाबीचा फायदा उचलून नराधमाने तिला घरी बोलावले.

पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी होती, याच बाबीचा फायदा उचलून नराधमाने तिला घरी बोलावले.

पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी होती, याच बाबीचा फायदा उचलून नराधमाने तिला घरी बोलावले.

भिवंडी, 08 डिसेंबर : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या (Rape Case) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच भिवंडीत (Bhiwandi) एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्रान इब्राहिम शेख (वय 38) असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.

पीडित मुलगी व नराधम एकच इमारतीमध्ये राहत असून नराधम वरच्या मजल्यावर राहतो. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याच बाबीचा नराधम आरोपीने फायदा उचलून पीडित चिमुरडीला घरात कुणी नसतांना तो राहत असलेल्या पहिल्या माळ्यावर बोलावले व तेथे चिमुरडीबर बळजबरीने अत्याचार केला.

या घराच्या आत दडलंय सरप्राइझ; INSIDE PHOTO पाहाल तर नजर हटणार नाही

नराधमाच्या अत्याचारामुळे वेदना असाह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेले तिची विचारपूस केली, असता तीने घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर या महिलेनं तिच्या आईला फोनद्वारे नराधम इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर दिली.

पालघर साधू हत्याकांडातील 47 आरोपींना जामीन मंजूर

आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर तिच्यावर घडलेला प्रकार उघड होताच पीडितेच्या आई-वडिलांना धक्काच बसला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधम इम्रान शेख याच्याविरोधात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नारपोली पोलिसांनी नराधम इम्रान शेख यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

First published:

Tags: Rape, बलात्कार, भिवंडी