35 हजारात remdesivir injection चे इंजेक्शन, वसईत धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

35 हजारात remdesivir injection चे इंजेक्शन, वसईत धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

'तुमचे इंजेक्शन मिळाले आहे ते घेवून जा' पण त्यासाठी 35 हजार लागतील मात्र....

  • Share this:

नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या (Corona) महामारीत रेमडेसीवीरची (remdesivir injection)मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत.

गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील महिलेचे पती कोरोनाबाधित झाल्याने ते नालासोपारा येथील विनायका रुगणालयात दाखल झाले होते. तेथील डॉक्टरांनी तिला रेमडेसीवीर इंजेक्शन आणायला सांगितले. तिने सर्व दुकाने  फिरून सुद्धा कुठेच सापडले नाही तिने बाजारात चौकशी केली. परंतु, तिला कुठेच मिळाले नाही मग तिला अज्ञात इसमाकडून सामिउल्ला फारुख शेख याचा नंबर मिळाला त्याला संपर्क केला असता त्याने 'मी संध्याकाळी आणून देतो' असे सांगितले. मात्र, तो आला नाही. त्याने तिला मीरा रोड येथे बोलावले आणि एका इंजेक्शनचे 35000 रुपये सांगितले. त्यामुळे व्यथित झाल्याने त्या महिलेने ही लूट थांबवण्यासाठी तिने मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त सदानंद दाते यांना कळवले, त्यांनी तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना ही माहिती दिली.

लगेच अतिरिक्त पोलीस आयुक्त एस जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पलांडे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे अनिल शिंदे मोरे आनंद मोरे,उमेश वरठा, राकेश शिरसाट,सुखराम गडाख, शशिकांत पोटे,विनायक राउत,ट्विंकल कदम, योगेश नागरे,शेखर पवार याचं पथक बनवले.

एनसीबी चौकशीत Drug पेडलरचा धक्कादायक खुलासा

ज्या महिलेने पोलिसांनी माहिती दिली ती महिला पुन्हा येण्यास तयार नव्हती. अर्चना नलावडे ही बोगस गिऱ्हाईक बनली तिने त्या नंबरवर संपर्क करून 'माझी आई खूप आजारी आहे तिला रेमडेसीवीर इंजेक्शन ची गरज आहे'. फोन करून विनवणी करीत होती अक्षरशः फोनवर रडली तेव्हा त्याने मीरा रोड येथील नयानगर बॅक रोड येथे बोलावले आणि  2 तास तिथे बसवून ठेवले तिथून जवळ असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये एक दोन मेडिकल दुकानात घेवून इकडे तिकडे फिरवत राहिला त्याला बघायचे होते की, खरंच या महिलेला गरज आहे का? की आमच्यावर सापळा लावला अशी शंका असल्याने त्यांनी त्यादिवशी इंजेक्शन दिले नाही.

नलावडे यांनी त्यांचा रडलेला चेहरा बघून आरोपींची खात्री पटली असावी म्हणून दुसऱ्या दिवशी तिच्या नंबरवर फोन करून 'तुमचे इंजेक्शन मिळाले आहे ते घेवून जा' पण त्यासाठी 35 हजार लागतील मात्र नलावडे यांनी रडून रडून मला अजून 4 इंजेक्शन लागणार आहेत अजून बऱ्याच लोकांना पाहिजे आहेत अस सांगून 13500 रुपयात सौदा पक्का केला आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्यांच्या नंबरवर फोन करून मीरा रोड येथे बोलावले.

शाहिद कपूर पुन्हा एकदा झळकणार पौराणिक चित्रपटात; 'कर्ण'च्या भूमिकेत दिसणार?

मग त्या समिउल्ला च्या मोटारसायकल वर बसून एक दोन हॉस्पिटलजवळ घेवून गेला. पोलीस त्याच्या पाठोपाठ साध्या वेशात मागे पुढे फिरत होते. शेवटी समिउल्ला हा त्याचा साथीदार महम्मद तरबेज शेख व मोहम्मद इर्शाद अब्दुल हनांनी हे दोघे ही मोटारसायकल वरून आले. एका ठिकाणी उभे राहून रेमविन कंपनीचे 3950 किंमतीचे  रेमडीसीवीर इंजेक्शन 13500 रुपये देवून घेतले त्यानंतर आधीच दबा धरून  बसलेल्या पोलिसांनी 3 जणांच्या मुसक्या आवळून एक इंजेक्शन ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता अजून 2 इंजेक्शन सापडले असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या 3 मोटारसायकली तुळींज पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ब्रिटिश महिलेला करायचंय 93 वर्ष जुन्या झुंबराशी लग्न, कारण वाचून थक्क व्हाल

यातील 2 जण हे फार्मासिस कंपनीत काम करत आहेत. तर एक जन ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात कोणते रॅकेट तर सामील नाही ना याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच यांनी या अगोदर किती जणांना विकली याचा पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.

Published by: sachin Salve
First published: April 20, 2021, 11:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या