मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सासरचा त्रास नकोसा झाला, पल्लवीने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

सासरचा त्रास नकोसा झाला, पल्लवीने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मृतक पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला

मृतक पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला

मृतक पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  sachin Salve

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 27 ऑगस्ट : सासरच्या जाचाला कंटाळून एका 34 वर्षीय विवाहितेने गळफास (commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा (bhandara) शहरात घडली आहे. या प्रकरणी नवऱ्यासह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळफास घेऊन 34 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना भंडारा शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. पल्लवी प्रवीण लांजेवार (वय 34) असं मृतक विवाहितेचं नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी पल्लवीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पल्लवीच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतक पल्लवीचा तिच्या सासरकडील लोक शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याने तिने आत्महत्या केल्याच्या आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी भंडारा शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सासरकडील मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहे.

औरंगाबादेत वसतीगृहात विद्यार्थिनीने घेतला गळफास

दरम्यान, 'जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे. पण मला आता कंटाळा आला जगण्याचा' अशी चिठ्ठी लिहून एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने देवगिरी महाविद्यालयाच्या वसतीगृहात आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

(Mumbai : अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला बॅगेत; स्टेशन परिसरातील धक्कादायक प्रकार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सर्जेराव कोल्हे ( 20 वर्षीय) असं या तरुणीचं नाव आहे. आरती ही जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील गुरुपिंप्री गावात राहणारी होती. शेतकरी कुटुंबातील आरती ही पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला आली होती. देवगिरी महाविद्यालयामध्ये बीकॉम प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. गुरुवारी कॉलेज पूर्ण केलं, दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणी दुपारी क्लास गेल्या होत्या, त्यानंतर तिने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.

First published: