मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेमात झाला धोका, तरुण रेल्वेवर चढला आणि हायहोल्टेज तारेला पकडलं, पुण्यातला VIDEO

प्रेमात झाला धोका, तरुण रेल्वेवर चढला आणि हायहोल्टेज तारेला पकडलं, पुण्यातला VIDEO

पुणे गोरखपुर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उभी होती.

पुणे गोरखपुर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उभी होती.

पुणे गोरखपुर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उभी होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 1 ऑक्टोबर : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमभंगातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. रेल्वेवर चढून त्याने विद्युत तारांना स्पर्श करत आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

रेल्वेच्या डब्यावर चढून एका तरुणाने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हात लावल्यामुळे हा तरुण जळाला. पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. विद्युत तारांना स्पर्श केल्याने त्याच्या संपूर्ण शरीराभोवती आगीचे लाटा होत्या. ही घटना सकाळी घडली. यात हा यात तरुण 70 ते 80 टक्के भाजला आहे. प्रेम भंगातून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - loan app ने लोन घेऊ नका! 4778 पुणेकरांचे अश्लील फोटो करून लाखो रुपयांना लुटले, मोठी टोळी गजाआड

पुणे गोरखपुर एक्सप्रेस सकाळी पुणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एकवर उभी होती. यावेळी याच ट्रेनचा प्रवासी असलेला 28 वर्षीय तरुणाने रेल्वेच्या डब्यांवर चढण्याचा प्रयत्न केला. त्याला 2 वेळा रेल्वे कर्मचाऱ्यांनी हटकले. परंतु तिसऱ्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांची नजर चुकवून हा तरुण गोरखपूर एक्सप्रेसच्या डब्यांवर चढला आणि त्याने हाय व्होल्टेज विद्युत तारांना हात लावला. सध्या त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

गोवर्धन मल्ला असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे वय 33 आहे. तसेच तोमुळचा कटकचा होता. तसेच त्याच्याकडे विशाखापट्टनमचे तिकिट सापडले आहे. तो खेड तालुक्यातील खळ उंबरे या गावातील एका कंपनीत कामाला होता. प्रत्यक्ष दर्शी त्याला थांबवत होते. तरीही त्याने हायहोल्टेजला हात लावला आणि ही दुर्घटना घडली.

First published:

Tags: Love, Pune