Home /News /crime /

दोन महिन्यापूर्वी घरी झालं कन्येचं आगमन, रोशनने शुक्रवारी जे केले...

दोन महिन्यापूर्वी घरी झालं कन्येचं आगमन, रोशनने शुक्रवारी जे केले...

रोशनची पत्नी लहान चिमुरडीला सांभाळत होती. त्यानंतर खोलीत कुणीही नसताना सोशल वरच्या माळ्यावरील बेडरुममध्ये गेला

    नागपूर, 03 ऑक्टोबर : देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये एकाच दिवसात दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  जुना बगडगंज भागात आजारपणाला कंटाळून एका 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार,  रोशन लाडेकर (वय 31) राहणार बगडगंज याने आजारपणाला कंटाळून जीवन यात्रा संपवली. रोशनला गेल्या 7 ते 8 वर्षांपासून ॲसिडीचा त्रास होता. त्याने अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. पण, कोणताही फरक पडला नाही. रोशन हा  खासगी कंपनीत काम करत होता. दीडच वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते आणि दोनच महिन्यांपूर्वी रोशन हा एका गोंडस मुलीचा बाप झाला होता. घरात नव्या पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे वातावरण होते. पण, दुसरीकडे रोहन हा पोटात होत असलेल्या त्रासामुळे त्रस्त होता. चखणा खाल्ला म्हणून संतापलेल्या नवऱ्याने बायकोला पेटवले, विरारमधील धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी रोशन आपल्या मुली आणि पत्नीसोबत घरात होता. रोशनची पत्नी लहान चिमुरडीला सांभाळत होती. त्यानंतर खोलीत कुणीही नसताना सोशल वरच्या माळ्यावरील बेडरुममध्ये गेला आणि सिलिंग फॅनला   साडीने बांधून गळफास घेतला. बराच वेळ झाला रोशन खाली न आल्यामुळे पत्नी त्याला उठवण्यासाठी गेली असता खोलीतून काही आवाज आला नाही. त्यानंतर आतमध्ये डोकावून पाहिले असता रोशनने गळफास घेतल्याचे आढळून आले.  त्यामुळे पत्नीने एकच आक्रोश केला. 'अयोध्येनंतर आता...' शरद पवारांनी 'या' चर्चेबद्दल व्यक्त केली चिंता, म्हणाले... पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रोशनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रोशनच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: नागपूर

    पुढील बातम्या