मुंबई हादरली ! 3 वर्षाच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

मुंबई हादरली ! 3 वर्षाच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलांचा सामूहिक बलात्कार

3 वर्षाच्या मुलीवर 2 अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 नोव्हेंबर: समाजातील क्रूरता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईसारख्या शहरातही महिलांची आणि अगदी लहान मुलींची पिळवणूक सुरूच आहे. मुंबईमध्ये एका चिमुकलीवर 2 अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3 वर्षाच्या चिमुरडीवर 2 अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे मुंबईमध्ये खळबळ माजली आहे.दोन्ही आरोपींची रवानगी बालसुधारगृहामध्ये करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याबाबत तपास करत आहेत. आरोपींनी हा गुन्हा का केला? पीडित मुलीला ते कधीपासून ओळखत होते याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईत खळबळ माजली आहे.

आजकालच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुण मुलीच काय पण अगदी अजाणत्या वयातील मुलीही सुरक्षित नाहीत. अशा नराधमांना कायद्याचा वचक बसल्याशिवाय या घटना बंद होणार नाहीत.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 21, 2020, 12:36 PM IST

ताज्या बातम्या