नव्या नवरीला घेऊन घरी परतले अन् चोराने तोपर्यंत लाखो रुपये पळवले!

नव्या नवरीला घेऊन घरी परतले अन् चोराने तोपर्यंत लाखो रुपये पळवले!

यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस दरवाजा आतून लावलेला असल्याचा त्यांना अंदाज आला

  • Share this:

उल्हासनगर, 04 मे:  नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय लग्न समारंभात व्यस्त असताना घरात घरफोडी झाल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये (Ullhasnagar) समोर आला आहे. चोरट्यानी लग्न घरात 3 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. दरम्यान या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी (Vitthalwadi police) 3 आरोपींसहित एका अल्पवयीन चोरट्याला अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प 4 येथील आनंद विद्यालयाजवळ रघुनाथनगर या परिसरात विकास दुबे हे व्यापारी राहतात. 28 एप्रिल रोजी विकासचे लग्न होते. प्रवीण इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये त्याचे लग्न असल्याने तो आणि त्याचे कुटुंबीय सकाळी हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी घराला कुलूप लावले होते. 29 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास नवरा विकास पत्नी आणि कुटुंबीय घरी पोहचले.

सांगलीत 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन, जयंत पाटलांची घोषणा

यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचा लॉक उघडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस दरवाजा आतून लावलेला असल्याचा त्यांना अंदाज आला. विकास आणि त्यांचा मामा घराच्या मागील बाजूस गेले तेव्हा किचनच्या खिडकीचा ग्रील वाकवून अज्ञात इसमांनी घरात प्रवेश केला असल्याचे त्यांना दिसून आले. तसंच त्यांना मुख्य दरवाजा आतून लॉक केलेला आढळला.

चोरट्याने घराच्या बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाट उघडून त्यातील 2 लाख 50 हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा 3 लाख 63 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी विकासच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्र फिरवली.

IPL BREAKING: IPL 2021 रद्द, BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

त्यानंतर अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपी सुनील वसंत पारधे  अशोक शिवराम दिघव, विकी वाल्मिक पगारे  यांना पोलिसांनी अटक केली . हे सर्व आरोपी अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी भिवंडीच्या बालसुधारगृहात केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 50 हजार रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा 3 लाख 63 हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 5 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे धनंजय करपे यांनी दिली.

Published by: sachin Salve
First published: May 4, 2021, 2:42 PM IST

ताज्या बातम्या