मुंबईत बॉलिवूड स्टारच्या घराबाहेर तरुणीवर सामूहिक बलात्कार, मित्रांनीचं केला विश्वासघातमुंबई, 15 मे: सध्या मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमुळं कडक निर्बंध लादण्यात आले आहे. त्यामुळे जागोजागी चौकात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केलं आहे. तसेच नागरिकांना विनाकारण घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. असं असताना महिलांवर होणाऱ्या अत्याचारात काहीही कमी आली नाही. मुंबईत सध्या कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी होतं असताना, मुंबईतील ब्रांद्रा बॅंडस्टॅंड परिसरात एका युवतीवर सामूहिक बलात्कार (Gang rape in mumbai) केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी तरुण हे पीडितेच्या ओळखीचे असून चांगले मित्र आहेत.
बुधवारी (12 मे) सायंकाळी मुंबईतील बांद्रा बॅंडस्टॅंड परिसरात तीन मित्रांनी संगनमत करून आपल्याच मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. संबंधित घटना बॉलिवूडमधील बड्या स्टारच्या घरासमोर घडल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आरोपी हे 19 ते 21 या वयोगटातील असून बांद्रा पोलिसांनी तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तीनही आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
हे ही वाचा-भयंकर! नराधमांनी रुग्णालाही सोडलं नाही, कोरोनाबाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार
पीडित तरुणी आणि तीनही आरोपी शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आहे. 3 आरोपी आणि पीडित एकमेकांना चांगलं ओळखतात. याच मैत्रिचा फायदा घेत आरोपींनी हे धक्कादायक कृत्य केलं आहे. त्यानी बुधवारी सायंकाळी गोड बोलून पीडितेला बांद्रा बँडस्टँड परिसरात नेलं. त्यानंतर सायंकाळी परिसरातील वर्दळ कमी होताचं. तिन्ही आरोपीनी एका पाठोपाठ एक पीडितेवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास बांद्रा पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape, Mumbai