मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

24 तासात कुटुंब पोरकं; एकापाठोपाठ 3 सख्ख्या भावांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

24 तासात कुटुंब पोरकं; एकापाठोपाठ 3 सख्ख्या भावांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, कोचस ठाण्याच्या क्षेत्रातील 3 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. यातील दोघांचं शवविच्छेदन केलं गेलं आहे. (3 Brothers Died)

मिळालेल्या माहितीनुसार, कोचस ठाण्याच्या क्षेत्रातील 3 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. यातील दोघांचं शवविच्छेदन केलं गेलं आहे. (3 Brothers Died)

मिळालेल्या माहितीनुसार, कोचस ठाण्याच्या क्षेत्रातील 3 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. यातील दोघांचं शवविच्छेदन केलं गेलं आहे. (3 Brothers Died)

  • Published by:  Kiran Pharate
पाटणा 16 ऑगस्ट : एका कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला, जेव्हा एकाच दिवसात कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील असून यात एकापाठोपाठ तीन सख्ख्या भावांनी जगाचा निरोप घेतला. या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र नातेवाईक आणि स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे, की तिन्ही भाऊ दारू प्यायचे. चोवीस तासात तीन भावांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. अनियंत्रित ट्रक थेट घरात घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, पती-पत्नीवर झोपेतच काळाचा घाला संपूर्ण गावात भयाण शांतता पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोचस ठाण्याच्या क्षेत्रातील 3 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. यातील दोघांचं शवविच्छेदन केलं गेलं आहे. मात्र मृत्यूचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या घटनेत भगवान चौधरी (वय ६०), राजाराम चौधरी (वय ५६) आणि दशरथ चौधरी (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दावा केला की एक औषधाची बाटली जप्त करण्यात आली असून सध्या तपास सुरू आहे. भगवान चौधरींचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. यानंतर त्याच दिवशी रात्री ९ वाजता राजाराम चौधरी आणि मंगळवारी सकाळी ७ वाजता दशरथ चौधरी यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांचं म्हणणं आहे, की पोटदुखी, उलटी आणि अचानक आजारी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अमरावती : 3 तास चाकू पाठीतच राहिला; स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार मृत राजाराम चौधरी यांच्या पत्नी तेत्रा देवी यांनी सांगितलं की, त्यांचे पती आणि कुटुंबातील इतर सदस्य अधूनमधून दारू प्यायचे, परंतु ज्या दिवशी त्यांची तब्येत बिघडली त्या दिवशी त्यांनी मद्यपान केलं नव्हते. पोटदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना स्थानिक खासगी दवाखान्यात नेण्यात आलं. मृत्यू झालेल्या तिघांचीही प्रकृती खालावली होती, असं तिचं म्हणणं आहे. पोलीस तपासात अद्याप काहीही समोर आलं नसून सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Shocking news

पुढील बातम्या