रायपुर, 30 नोव्हेंबर : येथे एका अल्पवयीन हत्येच्या (Murder) मागे प्रेम प्रकरणातील त्रिकोण असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्येच्या मुख्य (अल्पवयीन) आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार टिकरापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरियाखुर्द गावात मृतक राहुल तांडी (18) नेहरू नगरमध्ये राहत होता. मृत आणि अल्पवयीन आरोपी एकाच मुलीवर प्रेम करीत होते. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होता.
रविवारी रात्री मृत राहुल तांडी आपल्या मित्र गोपीसोबत बुढातालाब येथे बसला होता. दरम्यान जुनैद नावाचा मुलगा तेथे पोहोचला व दोघांशी बातचीत केली. यानंतर तिघेजण एकाच गाडीवर बसून बोरियाखुद आरडीए कॉलनीत निघून गेले होते. तेथे आधीच हजर असलेला अल्पवयीन आरोपी तिघांची वाट पाहत होता. जसे हे तिघे कॉलनीत पोहोचले तसं त्याने चालत्या गाडीतून राहुलला खेचून जमिनीवर टाकलं. यानंतर स्वत:कडे असलेला चाकू काढला व त्याच्यावर वार केले. दुसरीकडे आरोपीसोबत केलेल्या चौकशीनुसार प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलाने राहुल तांडी याची हत्या केली होती.
हे ही वाचा-पत्नी..प्रेयसी आणि कारस्थान! 16 दिवसांनंतर अखेर बेपत्ता मृतदेहाचं गूढ उघड
सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या सूत्रांनुसार या प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात येईल. रायपूरमध्ये वारंवार होत असलेल्या हिंसेच्या बातम्यांमुळे सर्वांनीच चिंता व्यक्त केली आहे. डीजीपी यांनी एक बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना प्रोफेशनल पोलिसिंगवर जोर देण्याचं आवाहन केलं आहे. रायपुरचे एसएसपी अजय यादव यांनी चाकू कोठून मागविण्यात आला, याबाबत चौकशी केली असता अॅमेजॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनाही पत्र लिहिलं आहे. पोलीस या सर्व प्रकरणात काळजी घेत असली तरी अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.