Home /News /crime /

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

चौहान अनेक महिन्यांपासून एका तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे आढळून आले.

    नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead body) घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळीच्या सुमारास घडली. या व्यक्तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. काय आहे प्रकरण - सेक्टर 49 चे पोलीस निरीक्षक यशपाल धामा यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी पोलिसांना माहिती मिळाली की बरौला गावात राहणारा अजय चौहान (24) याने पंख्याला गळफास (Boyfriend Commit Suicide) लावून घेतला आहे. चौहान याला त्याच्या ओळखीच्या लोकांनी नोएडा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लिव्ह-इनमध्ये राहायचे दोन्ही -  यशपाल धामा यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान चौहान अनेक महिन्यांपासून एका तरुणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचे आढळून आले. घरमालकाने पोलिसांना सांगितले की, चौहानने त्यांना दोघे पती-पत्नी असल्याचे सांगितले होते. चौहान हा एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीत कर्मचारी होता. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाइकांना कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तपासादरम्यान असे माहिती समोर आली की, शुक्रवारी रात्री चौहान आणि त्याच्या मैत्रिणीमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर चौहानने तिला एका खोलीत बंद करून दुसऱ्या खोलीत गळफास लावून घेतला. हेही वाचा - विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, सोबत यायला नकार दिल्यावर प्रियकराने तिच्या घरासमोरच घेतले विष तर या घटनेनंतर मृत चौहान याची प्रेयसी फरार आहे. पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत. मृत व्यक्ती चौहान हा मुजफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी होता. तसेच एका युवतीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Boyfriend, Love story, Suicide

    पुढील बातम्या