मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईतील (Mumbai) मालाड पूर्व भागात एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डबायने 24 वर्षीय तरुणीची छेडछाड केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुकेश प्रजापती असं या कर्मचाऱ्याचे नाव असून पोलिसांनी अटक केली आहे.
मुळव्याधीचा त्रास होत असल्यामुळे पीडित तरुणी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तिच्यावर मंगळवारी रात्री ऑपरेशन होणार होते. त्याच्या आदल्या दिवशी आरोपी वार्डबॉय प्रजापती हा पीडितेच्या खोलीत गेला आणि औषध लावण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला, असं वृत्त इंग्रजी संकेतस्थळ इंडिया टुडेनं दिलं आहे.
पबवरील कारवाईत नाव आल्यावर सुझेन खानचं स्पष्टीकरण; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
दिंडोशी पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रवीण कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन पूर्वी डॉक्टरांनी औषध लावण्याचे सांगितले आहे, असं आरोपी प्रजापती याने पीडित तरुणीला सांगितले. त्या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या प्राईव्हट पार्टला स्पर्श केला. घडलेल्या या प्रकारामुळे पीडित तरुणीने हॉस्पिटलमध्ये आरोपी विरोधात आरडाओरडा केला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.
भीषण दुर्घटना, यूरिया बनवणाऱ्या कंपनीत गॅस गळती, 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू
पीडित तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रजापती याच्याविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी प्रजापतीला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.