मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /22 वर्षीय तरुणीची वाढदिवशी हत्या; बाँडेज सेक्सच्या पद्धतीने घेतला जीव, मारेकऱ्याला जबर शिक्षा

22 वर्षीय तरुणीची वाढदिवशी हत्या; बाँडेज सेक्सच्या पद्धतीने घेतला जीव, मारेकऱ्याला जबर शिक्षा

तरुणीच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खूणा असल्यामुळे तिची हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात समोर आलं आहे.

तरुणीच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खूणा असल्यामुळे तिची हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात समोर आलं आहे.

तरुणीच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खूणा असल्यामुळे तिची हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात समोर आलं आहे.

वेलिंग्टन, 1 मे : ब्रिटीश पर्यटक ग्रेस मिलान हिची 2 डिसेंबर 2018 रोजी 22 व्या वाढदिवशी न्यूझीलंडमध्ये हत्या झाली होती. एका 26 वर्षीय तरुण जेस केम्पसन याने सेक्स करताना चोकिंगमुळे ग्रेसचा जीव गेल्याचा दावा केला होता. या प्रकरणानंतर मात्र जेस केम्पसनला न्यूझीलंड कोर्टाने चांगलंच सुनावलं आहे. जेसने दिलेल्या माहितीनुसार, सेक्स करताना तिने आपल्याला चोक करण्यास सांगितलं होतं, मात्र त्यात अपघाताने तिचा मृत्यू झाला. मात्र अशा नीच पातळीच्या दाव्यांना निकालात काढणाऱ्या घरगुती हिंसाचार विधेयकातील कलमांबद्दल (rough sex gone wrong) ग्रेसच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केलं. या प्रकरणाची खूप चर्चा झाली होती.

नेमकं काय घडलं?

ग्रेस मिलान ही युकेतील विकफॉर्ड येथील रहिवासी असून ती लिंकन विद्यापीठातून जाहिरात आणि मार्केटिंग या विषयात पदवीचं शिक्षण घेत होती. त्यादरम्यान ती भटकंतीसाठी निघाली होती. दक्षिण अमेरिकेनंतर ती दोन आठवड्यांसाठी न्यूझीलंडला थांबली होती. 30 नोव्हेंबरला 2018 रोजी ग्रेस ऑकलंडला गेली. दोन डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस असल्याने आदल्या रात्री नऊ वाजता ती व्हिक्टोरिया स्ट्रीटवर दिसली. 15 मिनिटात ती स्कायसिटीमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. 9:41 वाजता सिटीलाईफ हॉटेलमध्ये जेस केम्पसनसोबत ती अखेरची दिसली.

2 डिसेंबर 2018 रोजी वाढदिवसाच्या मेसेजला उत्तर न दिल्यानं मिलान कुटुंबीय चिंतेत होते. तीन दिवसांनंतर त्यांनी ग्रेस हरविल्याची पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर तब्बल 8 दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. त्याच्या आदल्या दिवशीच पोलिसांनी आरोपी जेस केम्पसनला ताब्यात घेऊन हत्येचा खटला सुरु केला होता. जेस बारटेंडर म्हणून काम करत होता. त्याआधी त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची केसही होती. याच्यावर बलात्कार, लैंगिक हिंसा, जीवे मारण्याची धमकी असे एकूण नऊ खटले दाखल असल्याचं समोर आलं. (Murder of Grace Millane)

हे ही वाचा-न्यायालयातून घटस्फोट का घेतला? महिलेला जात पंचायतीनं दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

टिंडर अॅपवर झालेल्या ओळखीतून ग्रेस आणि जेस यांची भेट झाली. त्यानंतर जेसने तिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. ग्रेसच्या हत्येनंतर जेसने मृतदेह लपविण्याची पद्धत इंटरनेटवर सर्च केली होती. त्याशिवाय काही पॉर्न फिल्म पाहिल्याचंही समोर आलं आहे. जेसशी टिंडरवर ओळख झालेल्या तिघी जणींनी त्याला मॅसोचिस्टिक आणि बाँडेज सेक्स (masochistic and bondage sex) आवडत असल्याचं कोर्टात सांगितलं. या पद्धतीत चोकिंगचाही समावेश होतो. ग्रेसच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खूणा असल्यामुळे तिची हत्या झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात समोर आलं आहे.

मात्र या पकरणात जेसला चोकिंग आवडत असल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. दोघांमध्ये संमतीने सेक्स झाले, मात्र बाँडेज सेक्स करणे फसले आणि त्यात ग्रेसचा मृत्यू झाला, असा दावा केला जात आहे. जेस केम्पसनला 21 फेब्रुवारी 2020 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून किमान 17 वर्ष त्याला पॅरोल मिळणार नाही. निकाल सुनावताना सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश असलेल्या ज्युरींपैकी अनेक जणं कोर्टातच रडत असल्याचं सांगितलं जातं.

First published:
top videos

    Tags: Crime news