दौलत पारीक, प्रतिनिधी
टोंक, 31 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. हत्या, अनैतिक संबंधातून फसवणुकीसोबत आर्थिक फसवणूक आणि चोरीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलींच्या लग्नापूर्वी घरात चोरी झाल्याची माहिती समोर आल्याने गोंधळ उडाला आहे. ही घटना टोंक जिल्ह्यातील दिग्गी पोलीस स्टेशन हद्दीतील डेचवास गावात भवानी सिंह यांच्या घरी घडली. लग्नाचे 13 लाखांचे दागिने आणि 7 लाखांहून अधिक रोख चोरट्यांनी पळवून नेली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
डेचवास गावात लग्नाच्या एक दिवस आधी घरात महिला संगीताचा कार्यक्रम होता. घरातील सदस्य लग्नाच्या विधीमध्ये व्यस्त असताना चोरट्यांनी हाताने लोखंडी पेटी लंपास केली. तसेच घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर बॉक्समधील रोख रक्कम व दागिने घेऊन चोरट्यांनी पलायन केले.
यानंतर सकाळी दागिने आणि रोकड पेटी न मिळाल्याने घरात शोधाशोध करण्यात आली. त्याचवेळी शेतात एक पेटी पडून असून पेटीत ठेवलेले काही कपडे विखुरले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लग्नघरात चोरी झाल्याची घटना समोर आली. या घटनेने एकच खळबळ उडाली. यानंतर चोरीची माहिती दिग्गी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
Love Marriageकेल्यावर तिनं त्याला गंडवलं, अशी अट ठेवली की, पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही नववधूंच्या मोबाईलसोबतच दोन पाहुण्यांचे मोबाईलही चोरट्यांनी पळवून नेले. पोलिसांनी कुटुंबीयांची तसेच पाहुण्यांची चौकशी केली. लग्नाआधीच सुमारे 20 लाख रुपयांची चोरी झाल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी तीन मुलींचे लग्न आणि त्याआधीच सर्व काही चोरीला गेल्याने गावात व परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून चोरीचा गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Rajasthan