मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दुकानात आलेल्या वृद्ध महिलेची बॅग ब्लेडने फाडून लंपास केले दीड लाख; 2 महिलांची हातचालाखी CCTV त कैद

दुकानात आलेल्या वृद्ध महिलेची बॅग ब्लेडने फाडून लंपास केले दीड लाख; 2 महिलांची हातचालाखी CCTV त कैद

लोणावळ्यातील चेतन फुटवेअर या दुकानात ही घटना घडली आहे. यात वयोवृद्ध ग्राहक महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून या दोन महिलांनी महिलेच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास केले आहेत (Theft Video)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Kiran Pharate

गणेश दुडम, लोणावळा 17 सप्टेंबर : लोणावळ्यातून चोरीची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. लोणावळ्यात चप्पल दुकानात आलेल्या ग्राहकाच्या पिशवीला ब्लेड मारून त्यातील 1 लाख 50 हजारांचा दोन महिलांनी लंपास केला. दोन अज्ञात महिलेंनी ही चोरी केली. या अज्ञात महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

मुख्याध्यापकाकडे मागितली लाच, ग्रामपंचायत सदस्यांसह उपसरपंच पतीला रंगेहाथ पकडले

लोणावळ्यातील चेतन फुटवेअर या दुकानात ही घटना घडली आहे. यात वयोवृद्ध ग्राहक महिलेच्या पिशवीला ब्लेड मारून या दोन महिलांनी महिलेच्या बॅगेतील दीड लाख रुपये लंपास केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन महिलांचा शोध घेतला जात आहे. लोणावळा शहर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली असून यात पाहायला मिळतं, की दोन महिला दुकानात खरेदी करत आहेत. यावेळी शेजारीच असलेल्या एका बाकावर असलेल्या वृद्ध महिलेच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष आहे. वृद्ध महिला आपल्या हातातील बॅगेतून मोठी रक्कम बाहेर काढत असल्याचं त्यांना दिसतं. यानंतर दोघीही या महिलेवर बराच वेळ लक्ष ठेवतात.

आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर रानडुक्कराचा हल्ला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

संधी मिळताच या दोन महिलांनी वृद्ध महिलेच्या पिशवीला ब्लेड मारलं आणि बॅगेतून 1 लाख 50 हजारांची रक्कम लंपास केली. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी सतर्क राहाण्याची गरज असल्याचा धडा नक्कीच मिळतो. सध्या पोलीस या दोन महिलांचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Theft