मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीपासून विभक्त होऊन माहेरी आलेल्या 2 बहिणींनीच दिली भावाची सुपारी, भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह

पतीपासून विभक्त होऊन माहेरी आलेल्या 2 बहिणींनीच दिली भावाची सुपारी, भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या आणि कलबुर्गी शहरात भाऊ नागराज आणि आईसोबत राहत होत्या. (Sisters Hire Killer to Kill Brother)

    बंगळुरू 08 ऑगस्ट : वैयक्तिक जीवनात भावाकडून वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपामुळे चिडलेल्या दोन बहिणींनी धक्कादायक निर्णय घेतला. या दोघीही आपल्या पतीपासून विभक्त झालेल्या होत्या. त्यांनी जुलैच्या अखेरीस कथितरित्या भावाला संपवण्यासाठी किलरला भावाची सुपारी दिली. कर्नाटकच्या कलबुर्गी शहरात ही घटना घडली आहे. प्रकरणी दोन्ही बहिणी आणि चार मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. 4 महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडलं; तर पदराने गळा आवळून पत्नीचा खून, प्रेमविवाहानंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य आपल्या भावाशी मतभेद असलेल्या दोन बहिणींनी कलबुर्गी शहरात जुलैच्या अखेरीस मारेकऱ्यांना सुपारी देऊन भावाची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. नागराज मातामारी (वय २९) हा कलबुर्गीतील गाजीपूर येथील रहिवासी होता. 29 जुलै रोजी हत्येनंतर त्याचा मृतदेह आळंद रस्त्यावरील भोसगा क्रॉस येथे आढळून आला. मोठ्या दगडाने त्याचं डोकं ठेचण्यात आलं होतं. तपासाअंती त्याच्या बहिणी अनिता, मीनाक्षी आणि सुपारी किलर अविनाश, आसिफ, रोहित आणि मोहसीन यांना अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, या दोन्ही बहिणी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या पतीपासून विभक्त झाल्या होत्या आणि कलबुर्गी शहरात भाऊ नागराज आणि आईसोबत राहत होत्या. नागराजला या गोष्टीचा राग यायचा की त्याच्या बहिणीचं प्रेमप्रकरण आहे. नागराजने त्यांना सल्ला दिला होता की एकतर त्यांच्यासोबत लग्न करा किंवा हे घर सोडून निघून जा. पुणे : 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार बहिणींना नागराजने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वारंवार दिलेले सल्ले आवडत नसल्यामुळे त्यांनी किलरला सुपारी देऊन भावाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. सुपारी किलर्सनी नागराजचा ऑटोरिक्षात गळा चिरून खून केला आणि नंतर त्याचा मृतदेह शहराच्या बाहेर फेकून दिला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या बहिणी आणि इतरांना माहिती दिली. सुपारी किलर्सना बहिणींनी केलेल्या फोन कॉल्सच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या