डोंबिवली, 30 डिसेंबर : 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेला लूटणाऱ्या आरोपींना डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवलीतील (Dombivali) ज्योतीनगर परिसरात राहणाऱ्या तिघांनी गेल्या काही दिवसांत पाच ठिकाणी चोरीच्या घटना केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. यांच्याकडून पोलिसांनी सर्व लुटलेले 2 लाख 55 हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत.
12 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास डोंबिवली पूर्व भागातील श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या 75 वर्षीय आजीबाई चंद्रप्रभा पिळणकर या कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. कचरा टाकून घरी परतत असताना दोन दुचाकीचालक त्यांच्या समोर आले. त्यांनी आजीबाईंच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढला. आजीबाई खाली पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस आरोपींच्या शोधात होते.
शाहिद आफ्रिदीने पुन्हा मर्यादा ओलांडली, 'काश्मीर'मध्ये परत नाक खुपसलं
अखेर टिळकनगर पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले. डीसीपी विवेक पानसरे , एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. या प्रकरणातील दोघे आरोपी विशाल वाघ, शंकर जाधव यांना अटक करण्यात आली. या दोघांना मदत करणारे गजानन घाडी याला सुद्धा अटक केली आहे. या तिघांनी आतापर्यंत 5 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन सोनसाखळी चोरीच्या घटना केल्या आहेत.
'सलमान खान म्हणजे देवदूत', रेमो डिसूझा यांनी भाईजानचे मानले आभार
एक लुटीची घटना मानपाडा व एक घटना महात्मा फुले पोलिस ठाण्यात केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.