Home /News /crime /

मुंबईत ड्रग्स माफियांचा सुळसुळाट, 2 वेगवेगळ्या घटनेत 50 लाखांचे ड्रग्स जप्त

मुंबईत ड्रग्स माफियांचा सुळसुळाट, 2 वेगवेगळ्या घटनेत 50 लाखांचे ड्रग्स जप्त

लॉकडाउनच्या काळात नव नवीन शक्कल लढवून अंमली पदार्थ विकणारे तस्कर आता उघडपणे अंमली पदार्थ विकू लागले आहे.

मुंबई, 30 ऑक्टोबर : गेल्या सात महिन्यांपासून मुंबईतील (Mumbai) ठप्प असलेल्या बाजारपेठा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे मुंबईत गर्दी देखील वाढू लागली आहे. याच गर्दीचा फायदा घेत आता अंमली पदार्थ तस्करही (Drug Mafia) सक्रिय झाले आहेत. मुंबई पोलिसांनी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 50 लाख रुपयांचे अंमली पदार्थ (Drug) जप्त केले आहे. जे मुंबईत विकण्याकरता आणले होते. मुंबईची आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा सर्व सेवा सुरू होवून गर्दी पुन्हा पहिल्यासारखी होवू लागली आहे. लॉकडाउनच्या काळात नव नवीन शक्कल लढवून अंमली पदार्थ विकणारे तस्कर आता उघड उघड अंमली पदार्थ विकू लागले आहे. त्यात अनलॉकचा फायदा घेवून अंमली पदार्थ तस्कर मुंबईत मोठ्या पद्धतीने सक्रिय झाले आहे. ‘माझी चिमुकली गेली..’, आईने फोडला हंबरडा; सगळ्यांच्या काळजाचं झालं पाणी! मुंबई पोलिसांनी 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 50 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. मुंबईतील नागपाडा भागातून अकलाख अन्सारी नावाच्या एका व्यक्तीला मुबंई पोलीस अंमली पदार्थ कक्षाने ताब्यात घेतले. त्याच्या अंगाची झडती घेतली असता 300 ग्रॅम एम डी म्हणजे मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. ज्याची बाजारात किंमत 30 लाख रुपये आहे. अकलाख हा मोठा अंमली पदार्थ तस्कर असून त्याला या आधी देखील अंमली पदार्थ तस्कर प्रकरणात अटक झालेली आहे. तर, दुसऱ्या एका घटनेत पी डिमेलो रोडवर सलीम शेख नावाच्या तरुणाला मुंबई क्राईम ब्रांच युनिट 4 ने सापळा रचून अटक केली. सलीम हा 111 ग्रॅम हेरॉईन मुंबईत विकण्याकरता घेवून आला होता. पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रत्येक वस्तू विकण्यासाठी मुंबईत जशी जागतिक बाजारपेठ आहे तसंच अंमली पदार्थ तस्करांकरता मुंबई शहर हे नेहमीच ड्रग हब राहिले आहे. मुंबईत रोज कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. ही तस्करी करुन अगदी सामान्य माणसांपासून ते मोठं मोठ्या श्रीमंत लोकांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचवले जातात.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai police

पुढील बातम्या