Home /News /crime /

Destination Wedding मध्ये घुसून 2 कोटींची चोरी, पाहुणा बनून आला चोर

Destination Wedding मध्ये घुसून 2 कोटींची चोरी, पाहुणा बनून आला चोर

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचा पाहुणा बनून आलेल्या चोरट्याने (2 crore jewelry stolen from five star hotel) तब्बल 2 कोटी रुपयांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    जयपूर, 26 नोव्हेंबर: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्नाचा पाहुणा बनून आलेल्या चोरट्याने (2 crore jewelry stolen from five star hotel) तब्बल 2 कोटी रुपयांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील एक कुटूंब डेस्टिनेशनल (Maharashtrian family destination wedding) वेडिंगसाठी जयपूरला गेलं होतं. याच कुटुंबाचा सदस्य असल्याचा बनाव करत चोरट्यानं हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि दागिने लुटून तो पसार झाला. अशी केली चोरी राजस्थानच्या जयपूरमध्ये एक महाराष्ट्रीय कुटूंब डेस्टिनेशन वेडिंगसाठी एकत्र जमलं होतं. एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील 45 खोल्या त्यांनी बुक केल्या होत्या. घटनेच्या रात्री महिला संगीताचा कार्यक्रम ऐकण्यासाठी सगळी वऱ्हाडी मंडळी शहरातील एका गार्डनमध्ये गेली होती. त्याच दरम्यान हा चोरटा हॉटेलमध्ये पोहोचला आणि कुटुंबाचा सदस्य असल्याचा दावा करत त्याने रिसेप्शनवरून रुमची किल्ली मागितली. त्याच्या देहबोलीवरून कुठलाही संशय न आल्यामुळे त्याला कर्मचाऱ्यांनी किल्ली दिली. किल्ली घेऊन चोरटा रूममध्ये गेला आणि काही वेळाने त्याने वेटरला बोलावून घेतले. रुममधील लॉकरचा पासवर्ड आपण विसरलो असून तो सांगण्याची विनंती त्याने वेटरला केली. वेटरने पासवर्ड सांगितल्यानंतर त्याने लॉकर उघडून त्त्यातील दागिने लंपास केले. हे वाचा - सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्..; शिक्षकानं मुलीला दिली आयुष्यभराची जखम पोलीस तपास सुरू चोरलेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 2 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हॉटेल प्रशासनाच्या सुरक्षा निकषांवरदेखील या प्रकारामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यात 2 कोटी रुपयांचा डायमंड सेट आणि 96 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणात हॉटेलच्या काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. फाईव्ह स्टार हॉटेल असताना अशा प्रकारे आगंतुक व्यक्ती येऊन थेट रुममध्ये घुसखोरी करते आणि लॉकर उघडून कोट्यवधींचे दागिने लंपास करते, ही बाब धक्कादायक आणि आश्चर्यकारक असल्याचं अनेकांचं मत आहे. यात हॉटेल कर्मचाऱ्यांपैकी काहीजणांची साथ असल्याशिवाय हे शक्य नसल्याचीही चर्चा आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Jaipur, Theft, Wedding

    पुढील बातम्या