• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची गळफास घेत आत्महत्या; गावकऱ्यांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

आईच्या अफेअरबाबत समजताच 2 मुलांची गळफास घेत आत्महत्या; गावकऱ्यांनी महिलेला दिली भयंकर शिक्षा

दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

एका महिलेच्या 22 वर्षाच्या कृष्ण दास आणि 20 वर्षाच्या कौशिक दास या दोन मुलांनी फाशी घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला.

 • Share this:
  कोलकाता 23 ऑगस्ट : एक हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात महिलेच्या प्रेम संबंधाबद्दल (Love Affair) माहिती होताच तिच्या दोन मुलांनी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनेनंतर संतापलेल्या गावातील महिलांनी या महिलेला केसांना धरून ओढत रस्त्यावर नेलं आणि तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या (Crime in West Bengal) हुगली येथील गौघाटच्या सामान्तखंड गावातील आहे. येथील एका महिलेच्या 22 वर्षाच्या कृष्ण दास आणि 20 वर्षाच्या कौशिक दास या दोन मुलांनी फाशी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ उडाला. असं सांगितलं जात आहे, की आईच्या प्रेम प्रकरणाबद्दल मुलांना माहिती झालं होतं. याच कारणामुळे दोघांनी आत्महत्या केली. गावातील लोकांनी या महिलेसह तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप केला आहे. असं म्हटलं जात आहे, की काही वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचाही संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर आता मुलांचाही मृत्यू झाल्यानं गावात गोंधळ उडाला आहे. रात्रभर केली राखीची तयारी अन्..; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम या घटनेनंतर गावातील महिलांनी स्वतःच या मुलांच्या आईला शिक्षा दिली आहे. या महिलांनी तिला केसाला पकडून रस्त्यावर ओढत आणलं. यानंतर तिला मारहाण केली. बराच वेळ चाललेल्या या गोंधळानंतर पोलीस गावात पोहोचले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी माहिती देताना आरामबागचे एसडीपीओ अभिषेक मंडल म्हणाले, की महिलेला मारहाण केली गेली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. महिलेच्या दोन मुलांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शवविच्धेदन अहवाल आल्यावर हे स्प्ष्ट होईल. या प्रकरणात आणखी एक बाजू समोर येत आहे ती अशी की, कृष्णादास याचं काही दिवसांपूर्वी आपली पत्नी पिया हिच्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याची पत्नी माहेरी गेली होती. याचदरम्यान कृष्णा दासनं गळफास घेत आत्महत्या केली. जेव्हा कौशकला हे माहिती झालं तेव्हा तो हे दुःख सहन करू शकला नाही आणि त्यानंही गळफास घेतला. हॅलो, बजाज फायनान्समधून बोलतेय...; लाखोंचा चुना लावणाऱ्या पुजाला नागपुरातून अटक दुसरकीकडे कृष्णा दासच्या पत्नीनं पती आणि दिराच्या हत्येचा आरोप आपल्या सासूवर केला आहे. तिचं असं म्हणणं आहे, की सासूनंच आपल्या प्रियकरासोबत मिळून या दोघांची हत्या केली आहे. तर, आपल्याला खोट्या आरोपात फसवलं जात असल्याचं या मुलांच्या आईचं म्हणणं आहे. मुलाचं सुनेसोबत भांडण झालं होतं, याच कारणामुळे त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप या महिलेनं केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: