Home /News /crime /

विकृतीचा कळस ! 'माझी नाही तर कुणाचीच नाही', भंडाऱ्यात तरुणाचं संतापजनक कृत्य

विकृतीचा कळस ! 'माझी नाही तर कुणाचीच नाही', भंडाऱ्यात तरुणाचं संतापजनक कृत्य

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने क्षुल्लक कारणावरुन आपल्या प्रेयसीची हत्या (Murder) केली आहे.

भंडारा, 30 नोव्हेंबर : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाखनीच्या पालांदुर कब्रस्थानजवळ एका 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह (Deadbody) आढळला होता. हा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत होता. मृतदेहाजवळ एक रक्ताने भरलेला चाकू (Knife) आणि विषाची बाटली आढळली होती. त्यामुळे ही आत्महत्या (Suicide) की हत्या (Murder) हे उलगडत नव्हतं. पण पोलिसांना (Police) अवघ्या काही तासांतच हत्येचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. मृतक तरुणीच्या प्रियकराने क्षुल्लक कारणावरुन तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

मृतक तरुणीचा प्रियकर आधी तिच्या घरी गेला

मृतक तरुणी ही इयत्ता 14 वीत शिकत होती. तिचं 19 वर्षीय तरुण नयन शहारे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पण त्यांच्या प्रेमाला मृतक तरुणीच्या कुटुंबियांचा विरोध होता. विशेष म्हणजे आरोपी काही दिवसांपूर्वी मृतक तरुणीच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने तिच्या कुटुंबियांकडे लग्नाची मागणी घातली होती. पण तिच्या कुटुंबियांनी त्याला साफ नकार दिला. त्यामुळे आरोपीला राग आला होता. हेही वाचा : आईने विश्वासाने लेकीला चुलत्याकडे सोपवलं, काकाचं घृणास्पद कृत्य, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

घराबाहेर पडलेल्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह आढळला

या दरम्यान मृतक मुलीच्या कुटुंबियांनी तिचं दुसऱ्या मुलासोबत लग्न लावण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी मुलीला बघण्यासाठी मुलगा आपल्या कुटुंबियांसोबत घरी देखील येणार होता. याच गोष्टीचं निमित्त साधून तरुणी दुकानातून सामान आणण्याचं कारण देत घराबाहेर पडली होती. ती सकाळी अकरा वाजता घरातून बाहेर पडली होती. पण त्यानंतर ती घरी परतलीच नाही. तिचा पालांदूर अड्याळ रस्तावरील कब्रस्थानाजवळ निर्जन स्थळी संशयितरित्या मृतदेह आढळून आला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मुलीच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला चाकू आणि विषाची बाटली आढळल्याने मृत्यूमागचं गूढ आणखी वाढलं.

पोलिसांकडून तपास

अखेर पोलिसांना संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मुलीची ओळख पटल्यानंतर तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मुलीचे कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले. आपल्या मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरीक आणि पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांचा सावरण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत झाला घात; कालव्याशेजारी आढळला मृतदेह

अखेर हत्येचं गूढ उकललं

पोलिसांनी मृतक तरुणीच्या कुटुंबियांची चौकशी केली. यावेळी मृतक मुलीचं एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्यासाठी लग्नाची मागणी घालण्यासाठी घरी आला होता. पण आपण नकार दिला होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. पोलिसांना तरुणीच्या प्रियकरावर संशय आला. त्यांनी वेळ न दडवता त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. प्रेयसीच्या कुटुंबियांनी लग्नाला नकार दिल्याच्या रागातून आपण हे अमानुष कृत्य केल्याचं त्याने कबुली जबाब दिला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या