मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'जान मैं मर रही हूं', Instagram वर मेसेज करत तरुणीने उचचलं टोकाचं पाऊल

'जान मैं मर रही हूं', Instagram वर मेसेज करत तरुणीने उचचलं टोकाचं पाऊल

शनिवारी रात्री पूजा घरात जेवण करून झोपली होती. मात्र, मध्यरात्री पूजाची तब्येत ढासळू लागली. यावेळी पूजाच्या घरच्यांनी तिची चौकशी केली असता तिने, विष प्यायल्याचे सांगितले.

  • Published by:  News18 Desk
कोरबा, 18 जुलै : छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तरुणीने प्रेमप्रकरणातून विष पिऊन आत्महत्या केली. विष घेण्यापूर्वी तिने इंस्टाग्राममध्ये लिहिले की, जान मैं मर रही हूं. तसेच मोबाईलवर रडत रडत मुलीने विष पितानाचा व्हिडिओही रेकॉर्ड केला. दरम्यान, मध्यरात्रीनंतर नातेवाइकांच्या लक्षात येताच तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - कोरबा येथील बाकीमोंगरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजरा बस्ती येथे 19 वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पूजा घरात जेवण करून झोपली होती. मात्र, मध्यरात्री पूजाची तब्येत ढासळू लागली. यावेळी पूजाच्या घरच्यांनी तिची चौकशी केली असता तिने, विष प्यायल्याचे सांगितले. यानंतर पूजाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी सांगितले की, पूजा एक वर्षापूर्वी बांकीमोंगरा येथील एका कापडाच्या दुकानात काम करत होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, वर्षभरापूर्वी तिचे रोहित गंभीर नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. काही दिवसांपूर्वी दोघेही एकत्र घरातून पळून गेले होते. यानंतर नातेवाइकांनी समजावल्यानंतर तिला घरी आणले. विष पिण्यापूर्वी पूजाने रोहितला स्वतः विष घेत आत्महत्या करत आहे, असा मेसेजही पाठवला आणि मोबाईलवर रडत विष पितानाचा व्हिडिओही बनवला. हेही वाचा - पहिल्या पत्नीकडून धोका म्हणून 90 दिवसात 3 लग्नांचा घाट; दोघींनीही मन मोडलं, शेवटी... दरम्यान, शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मात्र, आता पूजाच्या मृत्यूमागे रोहित जबाबदार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र, या आत्महत्येचे कारण हे पोलिसांच्या तपासातच कळणार आहे.
First published:

Tags: Chhattisgarh, Crime news, Suicide news

पुढील बातम्या