• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Amazon वरून विष मागवून तरुणाची आत्महत्या, मोबाईल चेक केल्यावर आईवडिलांना बसला धक्का

Amazon वरून विष मागवून तरुणाची आत्महत्या, मोबाईल चेक केल्यावर आईवडिलांना बसला धक्का

अमेझॉन कंपनीवरून (Amazon) विष (Poison) ऑर्डर करून 18 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे.

 • Share this:
  इंदूर, 20 ऑगस्ट : अमेझॉन कंपनीवरून (Amazon) विष (Poison) ऑर्डर करून 18 वर्षांच्या तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. त्याच्या मृत्यूनंतर आईवडिलांनी त्याचा मोबाईल (Mobile) तपासला, तेव्हा त्यांच्या ही बाब लक्षात आली. अशा प्रकारे ऑनलाईन विष विकण्यावर आईवडिलांनी आक्षेप घेतला आहे. असं मागवलं विष मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या आदित्य वर्मानं अमेझॉनवरून विष मागवल्याचं स्पष्ट झालं आहे. 20 जुलै रोजी पहिल्यांदा त्यानं अमेझॉनवरून विष ऑर्डर केलं. मात्र पुढच्या दोन दिवसात पेमेंट न झाल्यामुळे ती ऑर्डर कॅन्सल करण्यात आली. त्यानंतर 28 जुलै रोजी त्यानं पुन्हा एकदा अमेझॉनवरून सल्फास नावाचं विष मागवलं. विष पिऊन आत्महत्या 29 जुलैच्या रात्री हे विष पिऊन आदित्य झोपी गेला. त्याची तब्येत बिघडल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या आईवडिलांना त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. 30 जुलै रोजी आदित्यला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या घटनेचा त्याच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. त्याचे आईवडिल हे फळ विक्रीचं काम करतात. आदित्यही फळांचा गाडा लावून त्यांना व्यवसायात मदत करत असे. मात्र त्याने आत्महत्येचं पाऊल का उचललं, याबाबत कुठलीही कल्पना त्याच्या आईवडिलांना नाही. हे वाचा -'तिचा खून केला आणि माझ्यावर चाकूने केले 17 वार...' विरारच्या बँकेतील श्रद्धा या कंपनीविरोधात तक्रार या घटनेनंतर काही दिवसांनी आदित्यच्या आईवडिलांनी त्याचा मोबाईल चेक केला. त्यावेळी त्यांना आदित्यला झालेल्या विषबाधेचं रहस्य समजलं, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे. त्याने अमेझॉनवरून केलेल्या ऑर्डरचे तपशील त्यांना मिळाले आणि त्यांनी कंपनीविरोधात तक्रार करायचं ठरवलं. आदित्यच्या आईवडिलांनी अमेझॉन कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कंपनीनं जीवनावश्यक वस्तू आणि अन्नपदार्थ पुरवायला हरकत नाही, मात्र अशा प्रकारे विष किंवा चिनी हत्यारं पुरवणं हे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अशा कामासाठी कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
  Published by:desk news
  First published: