मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शाळेत जाण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे कुऱ्हाडीने केला पालकांवर हल्ला, आईवडिलांसह बहिणीला संपवलं

शाळेत जाण्यासाठी जबरदस्ती केल्यामुळे कुऱ्हाडीने केला पालकांवर हल्ला, आईवडिलांसह बहिणीला संपवलं

अल्पवयीन तरुणांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्तीची समस्या अनेक कुटुंबामध्ये पाहायला मिळते आहे. थोड्याथोडक्या कारणांमुळे मुलांमध्ये निर्माण होणारा राग कधीकधी त्यांच्या पालकांना देखील आवरता येत नाही

अल्पवयीन तरुणांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्तीची समस्या अनेक कुटुंबामध्ये पाहायला मिळते आहे. थोड्याथोडक्या कारणांमुळे मुलांमध्ये निर्माण होणारा राग कधीकधी त्यांच्या पालकांना देखील आवरता येत नाही

अल्पवयीन तरुणांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्तीची समस्या अनेक कुटुंबामध्ये पाहायला मिळते आहे. थोड्याथोडक्या कारणांमुळे मुलांमध्ये निर्माण होणारा राग कधीकधी त्यांच्या पालकांना देखील आवरता येत नाही

मॉस्को, 06 मार्च: अल्पवयीन तरुणांमध्ये वाढणारी हिंसक प्रवृत्तीची समस्या अनेक कुटुंबामध्ये पाहायला मिळते आहे. थोड्याथोडक्या कारणांमुळे मुलांमध्ये निर्माण होणारा राग कधीकधी त्यांच्या पालकांना देखील आवरता येत नाही. याच रागातून एका 17 वर्षीय मुलाने कुऱ्हाडीने हल्ला करत त्याच्या आई-वडिलांची आणि सख्ख्या बहिणीची हत्या केली आहे. त्यांनी केवळ या मुलाला शाळेत जाण्यासाठी आग्रह केला त्यामुळे ही घटना घडल्याची माहिती समोर येते आहे. त्याला शाळेत जायचे नव्हते, आईने आग्रह केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुलांना तिघांचीही हत्या केली. त्यानंतर या मुलाने घटनास्थळावरून पलायन केले मात्र पोलिसांनी काहीच तासात त्याला पकडले आहे.

रशियामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. रशियन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एका वेगळ्या दिशेने सुरू केला होता, पण शेवटी सत्य लक्षात आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. वदीम गोरबुनोव असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली की, त्याने हत्या केल्यानंतर त्याने वडील अॅलेक्सी यांच्या मृतदेहाचा चेहरा बिघडवला होता. त्यानंतर त्याने वडिलांच्या मृतदेहाला स्वत:चे कपडे घातले. जेणेकरून पोलिसांना असे वाटेल की पित्याने मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी सुरुवातील याच अँगलने तपास केला.

(हे वाचा-धक्कादायक वळण, अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला!)

पोलिसांनी वदीमच्या वडिलांना शोधण्यास सुरुवात केली होती. मात्र फॉरेन्सिक अहवालात समोर आले की तो मृतदेह वदीमचा नाही आहे. त्याचे वडील पेशाने वेल्डर होते, हा मृतदेह त्यांचाच आहे लक्षात आल्यावर पोलिसांनी या नव्या धाग्याच्या आधारावर एकंदरित घटनेचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना घरातच वदीमची आई गुल्या गोरबुनोव आणि बहिण युलिया यांचा मृतदेह सापडला.

(हे वाचा-फॉरमॅट करून नव्याकोऱ्या रुपात विकायचे महागडे चोरीचे मोबाइल,3 भामट्यांचा पर्दाफाश)

पोलिसांना घटनास्थळावरून साधारण 362 किलोमीटरवर वदीमचा शोध लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वदीमने गुन्हा कबुल केला आहे. वदीमने पोलिसांना अशी माहिती दिली की शाळेत जबरदस्तीने पाठवण्यावरुन त्याच्यात आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला आणि तो वाद विकोपाला गेला. मीडिया अहवालानुसार वदीम त्याच्या गणिताच्या शिकवणीवर खूप नाखूश होता. त्यामुळे त्याला शाळेत जायचे नव्हते.

First published:

Tags: Crime, Crime news, International, Murder, Murder news, Russia