'मी मरतेय, माझा शोध घेऊ नका' सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले, आज...

'मी मरतेय, माझा शोध घेऊ नका' सायलीचे शेवटचे शब्द दुर्दैवाने खरे ठरले, आज...

'सायली 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती'

  • Share this:

बीड, 18 नोव्हेंबर :  गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या 16 वर्षीय मुलीचा मृतदेह एक विहिरीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात असणाऱ्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली आहे.

शहरातील गणेश नगर भागात राहणाऱ्या सायली कल्याण पारेकर (वय 16) असं मृत मुलीचं नाव आहे. सायली ही 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. "मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका" अशी नोट लिहून ठेवली होती.

'नात्यामुळे लग्न करू शकलो नाही' म्हणत नवविवाहितेनं प्रियकरासोबत संपवलं आयुष्य

सायलीची सुसाईड नोट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता. पण, कुठेही तिचा मृतदेह आढळून आला नाही.

अखेर आज सकाळी गोविंदवाडी शिवारात विहिरीत एका मुलीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. हा मृतदेह सायलीचा असल्याचे समोर आले.  सायलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकचं खळबळ उडाली आहे.  सायलीने आत्महत्या केली की घातपात? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

ठाकरे सरकार गोंधळलेले, पाडण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही – चंद्रकांत पाटील

सायलीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा  अधिक तपास गेवराई पोलीस करत आहेत.

नवविवाहितने प्रियकरासोबत केली आत्महत्या

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील  लोहा तालुक्यातील वाळकी गावात विहिरीत आज दोन मृतदेह आढळून आले होते. गावातील 24 वर्षीय अविवाहित धनाजी कोलते आणि एका नवविवाहित मुलीचे हे मृतदेह असल्याचे समोर आले. या दोघांनाही सोबत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

बायकोनेच माझ्या खुनाची सुपारी दिली - भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. दिवाळी निमित्ताने ती माहेरी आली होती. मयत तरुण धनाजी आणि  तरुणी दोघेही नातलग होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीचे लग्न झाल्यामुळे दोघांची ताटातूट झाली होती. दिवाळीच्या निमित्ताने गावी आल्यानंतर या तरुणीने धनाजीची भेट घेतली. त्यानंतर दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शेतातील विहिरीतच दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

‘फुकाचे सल्ले देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी’, सिब्बल यांच्यावर हल्लाबोल

गावकऱ्यांनी घटनेची माहिती उस्माननगर ग्रामीण पोलिसांना दिली.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोघांचे मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली असून अधिक तपासानंतर यावर भाष्य करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.

Published by: sachin Salve
First published: November 18, 2020, 4:27 PM IST
Tags: beed

ताज्या बातम्या